कोणता CM बेस्ट, कुणाचं घटलं वजन? CM शिंदेंचा नंबर कितवा.. सर्व्हेतून धक्कादायक माहिती

कोणता CM बेस्ट, कुणाचं घटलं वजन? CM शिंदेंचा नंबर कितवा.. सर्व्हेतून धक्कादायक माहिती

Chief Minister Performance : लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. आता हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा (Jammu Kashmir) निवडणुकांची घोषणा झाली आहे. देशातील जनतेचा मूड आता कसा आहे याचा अंदाज घेण्यासाठी आजतक सी व्होटरने मूड ऑफ द नेशन नावाने एक सर्व्हे केला. या सर्व्हेत 1 लाख 36 हजार 463 लोकांची मतं जाणून घेण्यात आली. वेगवेगळे मुद्दे आणि राजकीय नेत्यांची लोकप्रियता यांबाबत प्रश्न विचारण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबाबतील लोकांची मतं वेगवेगळी आहेत.

या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता कमी झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये योगींच्या कामकाजावर 47 टक्के लोक समाधानी होते. फेब्रुवारी 2024 मध्ये हा आकडा 51 टक्के होता. मात्र पुढील सहा महिन्यांत त्यांची लोकप्रियता 39 टक्केच राहिली आहे. चांगला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या सर्व्हेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये 33.2 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना सर्वात चांगले मुख्यमंत्री मानले आहे. याआधी मागील वर्षात सर्वात चांगले सीएम म्हणून त्यांना 43 टक्के लोकांची पसंती होती.

योगींच्या बाबतीत काय निगेटिव्ह

योगी आदित्यनाथ कठोर आणि स्पष्ट भूमिका घेणारा नेता म्हणून ओळखले जातात. यूपीत पेपर लीक एक मोठा मुद्दा होता. फेब्रुवारीत पोलीस भरतीत पेपर लीकची घटना घडली. त्यानंतर सरकारने परीक्षाच रद्द करून टाकली. यामुळे युवकांत नाराजी दिसून आली. आता सहा महिन्यांनंतर पुन्हा परीक्षा होणार आहेत. आठवडाभरा आधी अलाहाबाद कोर्टाने 69 हजार सहायक शिक्षक भरती परीक्षा निकाल नव्याने जारी करण्याचे आदेश दिले होते. यामुळेही सरकार आणि योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा कमी करण्यास कारणीभूत ठरल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.

ममतांच्या बाबतीत काय ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता वाढल्याचे या सर्व्हेत दिसून येत आहे. ऑगस्ट 2023 मध्ये ममतांच्या कामकाजावर 32 टक्के लोक समाधानी होते. फेब्रुवारी 2024 मध्ये हा आकडा 33 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. आता सहा महिन्यांत त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ (46%) झाली आहे. चांगला मुख्यमंत्री म्हणून त्यांना यादीत तिसरा क्रमांक मिळाला आहे. कोलकाता प्रकरणानंतरही त्यांच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांना 9.1% लोकांनी समर्थन दिले आहे. फेब्रुवारीतील 8.4 टक्क्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्तच आहे.

मोठी बातमी : सेबीचा अंबानींना दणका; 25 कोटी दंडासह 5 वर्षांतपर्यंत शेअर बाजारात बॅन

ममतांची लोकप्रियता का वाढतेय

ममता बॅनर्जी यांनी स्वतः ला भाजप आणि पीएम मोदी यांच्या विरोधातील मुख्य विरोधी नेता म्हणून स्थापित केले आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केला आणि लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची विजयी घोडदौड कायम राखली. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राज्यात अनेक सामाजिक आणि आर्थिक योजना सुरू केल्या. याचा फायदा त्यांना झाला. ममता बॅनर्जी यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या थेट लोकांत जाऊन त्यांच्या समस्या ऐकतात आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात.

केजरवालांबाबतीत लोकांचं मत काय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत. आता त्यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे या सर्वेतून समोर आले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये केजरीवाल यांच्या कामकाजावर 58 टक्के जनता समाधानी होती. फेब्रुवारी 2024 पर्यंत हा आकडा 37 टक्क्यांवर आला. आता सहा महिन्यांत लोकप्रियतेत पुन्हा वाढ झाली आणि हा आकडा 44 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. चांगला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये 14 टक्के लोकांनी त्यांना चांगले मुख्यमंत्र्याची पावती दिली.

केजरीवलांची लोकप्रियता का घटली

दिल्ली दारू घोटाळ्याने अरविंद केजरीवाल यांचे मोठे नुकसान केले आहे. तसेच आम् आदमी पार्टीतील अन्य नेत्यांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यामुळे पक्षाचे नुकसान झाले. केजरीवाल स्वतः भ्रष्टाचाराचा कडाडून विरोध करत होते पण आज त्यांच्यासह पक्षावर गंभीर आरोप झाल्याने त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेला.
केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यातील वादाचाही फटका केजीवालांना बसला आहे. केजरीवाल सरकार आणि उपराज्यपाल यांच्यातील अधिकाराच्या लढाईने केजरीवाल यांच्या प्रतिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवलांनी नागरिकांना मोठी आश्वासने दिली होती मात्र यातील बहुतांश आश्वासने पूर्ण झाली नाहीत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा आम् आदमी पार्टीची कामगिरी निराशाजनक राहिली. केजरीवाल तुरुंगात असल्याने लोकांची सहानुभूती मिळेल असा अंदाज आप नेत्यांना होता. मात्र लोकसभा निवडणुकीत तसे दिसले नाही. भाजपने दिल्लीतील सर्व सात जागा जिंकल्या.

इलेक्शनआधी दलबदलूंचं टेन्शन! तिकीटासाठी गर्दी अन् धक्कातंत्राची तयारी; हरियाणात काय घडतंय?

..तरीही केजरीवालांचा प्रभाव दिसतोच

दारू घोटाळ्याचे प्रकरण 2022 मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणाचा तपास इडी आणि सीबीआय करत आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये मनीष सिसोदिया, ऑक्टोबर 2023 मध्ये संजय सिंह आणि मार्च 2024 मध्ये स्वतः अरविंद केजरीवाल यांना तुरुंगाची हवा खावी लागली. ऑगस्ट 2023 मध्ये केजरीवालांच्या कामकाजावर 53 टक्के लोक समाधानी होते. परंतु पुढे पक्षातील दोन नेत्यांची अटक आणि दारू घोटाळ्यात केजरीवाल यांनाच किंगपिन म्हंटले गेल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या कामकाजावर समाधानी असणाऱ्या लोकांची संख्या 37 टक्क्यांपर्यंत कमी झाली. यानंतर मार्च 2024 मध्ये केजरीवाल तुरंगात गेल्यानंतर त्यांची लोकप्रियता पुन्हा वाढली आहे.

एकनाथ शिंदेंच ठरणार किंगमेकर?

या सर्वेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेत हळूहळू वाढ होत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये शिंदे यांच्या कामकाजावर 35 टक्के लोक समाधानी आहेत. तर 31 टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत. पण 28 टक्के लोक मात्र असमाधानी आहेत. यावरून असे दिसून येत आहे की मुख्यमंत्र्यांचे कामकाज काही प्रमाणात लोकांच्या अपेक्षांनुसार होत आहे. कामकाजात सुधारणा करण्याची गरज मात्र आहे. संपूर्ण सरकारचा विचार केला तर 25 टक्के लोक सरकारच्या कामकाजावर पूर्ण समाधानी आहेत. 34 टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत तर 34 टक्के लोक मात्र पूर्ण असमाधानी आहेत. सरकारच्या प्रदर्शनावर राज्यात समिश्र परिस्थिती आहे. या सर्वेतून असेही दिसून आले आहे की राज्यातील जनतेसमोर बेरोजगारी हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. यानंतर महागाई आणि शेतकऱ्यांचे मुद्दे प्रमुख आहेत.

आलेख वाढतोय पण हळूहळू

शिवसेनेतील एक मोठा वर्ग अजूनही शिंदेचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाही. उद्धव ठाकरे सातत्याने टीका करतच असतात. भाजपच्या अधीन शिंदेंचे नेतृत्व आहे असेही काही जण मानतात. त्यांच्या पक्षांतर्गत विरोध आणि असंतोषामुळे सुद्धा शिंदेंची स्थिती कमकुवत होत आहे. शिंदे ज्यावेळी सरकारमध्ये आले त्यावेळी स्वतः ला स्थापित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचं आव्हान होतं नंतर अजित पवारांच्या एन्ट्रीने आव्हान अधिक कठीण झालं. असे असताना शिंदेंनी आपल्या स्वच्छ प्रतीमेसह कामकाज करण्यास सुरुवात केली. वादांमध्ये अडकले नाहीत. मोठे निर्णय घेतले. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीही सहकार्य केल. सध्यातरी महायुतीचा फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

हेमंत सोरेन बाबत लोकांचे मत काय

या सर्व्हेत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट 2024 मध्ये मुख्यमंत्र्‍यांच्या कामकाजावर 25 लोक संतु्ष्ट होते. 30 टक्के लोक काही प्रमाणात संतुष्ट होते तर 35 लोकांनी सोरेन यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. सरकारच्या कामकाजाचा विचार केला तर 27 टक्के लोक समाधानी आहेत. 37 टक्के लोक असंतुष्ट तर 34 टक्के लोक काही प्रमाणात समाधानी असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेत काढण्यात आला आहे.

Amazon सारख्या कंपन्या किरकोळ विक्रेत्यांच्या मुळावर.. भाजपाच्या मंत्र्याने पुरावेच दिले

सोरेन यांची लोकप्रियता का घटली

झारखंडमधील आदिवासी आणि ग्रामीण भागाती जनतेचा सर्वात मोठा पाठिंबा हेमंत सोरेन यांनाच आहे. पण या समाजाच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत असा मेसेज गेला तर त्यांचं समर्थन घटण्याची शक्यता आहे. खनन लीज आवंटन घोटाळ्यात अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप हेमंत सोरेन यांच्यावर झाले होते. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या तपासामुळे त्यांच्या राजकारणावर परिणाम झाला. यामुळे त्यांची स्थिती कमकुवत झाली आहे. राज्यात बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि गुंतवणुकीची कमतरता या समस्यांना सरकारला तोंड द्यावे लागत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube