पहिला अध्यक्ष अन् दोन खासदार; भाजपाच्या पहिल्या अध्यक्ष निवडीचे पॉलिटिक्सही खास..

पहिला अध्यक्ष अन् दोन खासदार; भाजपाच्या पहिल्या अध्यक्ष निवडीचे पॉलिटिक्सही खास..

BJP President : भारतीय जनता पार्टीचा नवा अध्यक्ष कोण? असा सवाल आता राजकीय (BJP President) वर्तुळात सारखा ऐकू येत आहे. याच कारण म्हणजे भाजपने नवीन अध्यक्ष नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. केरळमध्ये 31 ऑगस्ट (Kerala) रोजी होणाऱ्या आरएसएसच्या बैठकीआधी (RSS) भाजपच्या अध्यक्षाची घोषणा होईल असे सांगितले जात आहे. 1980 मध्ये स्थापन झालेल्या भाजपचे अध्यक्षपद (BJP) आतापर्यंत 11 नेत्यांनी भूषवले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी भाजपचे (Atal Bihari Vajpayee) पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते. वाजपेयी सहा वर्षे अध्यक्ष राहिले. वाजपेयी अध्यक्ष बनण्यामागे आणि अध्यक्ष पदावरून हटण्या पाठीमागेही अनेक कथा सांगितल्या जातात. या गोष्टी नेमक्या काय आहेत त्याची माहिती घेऊ या..

भाजप कसा अस्तित्वात आला

भारतीय जनता पार्टीची स्थापना कशी झाली हे जाणून घेण्याआधी तुम्हाला जनसंघाच्या इतिहासात डोकावून पहावे लागेल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या लोकतांत्रिक व्यवस्थेअंतर्गत देशात निवडणुकांची घोषणा करण्यात आली. सन 1952 च्या पहिल्या निवडणुकीआधी (Lok Sabha Elections) अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात आले. यामधीलच एक भारतीय जनसंघ नावाचा पक्ष होता. 1951 मध्ये स्थापन झालेला हा पक्ष उजव्या विचारसरणीचा होता. हा पक्ष स्थापन होण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता असे सांगितले गेले.

1952 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनसंघाला फक्त तीन जागा मिळाल्या. नंतर पाच वर्षांनी 1957 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनसंघाला चार जागा जिंकता आल्या. 1962 मध्ये 14, 1967 मध्ये 35 तर 1971 च्या निवडणुकीत 22 जागांवर विजय मिळाला होता. 1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका वादात सापडल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले. 1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची खासदारकी रद्द केली. न्यायालय ज्यावेळी हा निर्णय देत होते त्यावेळी देशातील जनता महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरले होते. जयप्रकाश नारायण या आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

मोठी बातमी : लॅटरल एंट्रीवरून मोदी सरकार बॅकफुटवर; विरोधानंतर थेट भरतीच रद्द

इंदिरा गांधींनी राजकीय स्वार्थाचा विचार करत संपूर्ण देशात आणीबाणी (Emergency) लागू केली. या निर्णयानंतर मिसा कायद्यांतर्गत विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यास सुरुवात झाली. याच कारवाईत जनसंघाचे अनेक नेते तुरुंगात डांबले गेले. 1977 मध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली. त्यावेळच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या विरोधात विरोधी पक्षांनी संयुक्त रूपात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. याच अभियानांतर्गत जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. विरोधकांमध्ये जितके लहान पक्ष होते ते जनता पार्टीत विलीन करण्यात आले.

या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारचे नेतृत्व करण्याची संधी मोरारजी देसाई यांना मिळाली. जनसंघाच्या कोट्यातून अटल बिहारी वाजपेयी यांना संधी मिळाली. त्यांना विदेश मंत्री करण्यात आले. पण हे सरकार जास्त दिवस चालू शकले नाही. 1980 च्या निवडणुकीत जनता पार्टीचा पराभव झाला आणि इंदिरा गांधी यांनी जोरदार वापसी केली.

इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर जनता पार्टीत दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्याने उचल खाल्ली. दिग्गज नेते मधू लिमये यांचे म्हणणे होते की एका पक्षात दोन संघटनेचे सदस्य राहू शकत नाहीत. तसं पाहिलं तर जनता पार्टीत असे अनेक नेते होते ज्यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्यता होती. हा मुद्दा जास्त चिघळू लागल्यानंतर संघाशी संबंधित नेत्यांनी स्वतः चा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि या पक्षाचं नाव होतं भाजप. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर जनता पार्टीतून काढून टाकण्यात आल्यानंतर संघाशी संबंधित नेत्यांनी 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात एक बैठक घेतली. 7 एप्रिल 1980 रोजी प्रकाशित इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सने या संदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.

भाजप अन् काँग्रेसला सारखंच टेन्शन; हरियाणाच्या मैदानात थर्ड फॅक्टरची एन्ट्री!

या रिपोर्टनुसार बैठकीत सुरुवातीला जनता पार्टीची चर्चा झाली आणि नंतर भारतीय जनता पार्टी या नावाने नव्या पक्ष स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर लगेच माजी मंत्री सिकंदर बख्त आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांनी अध्यक्ष पदासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या बैठकीत वाजपेयी सर्वात सिनियर होते. दोघांनी मांडलेल्या या प्रस्तावाचे बैठकीतील नेत्यांनी समर्थन केले. अध्यक्ष झाल्यानंतर वाजपेयींनी आपल्या पहिल्या टीमची घोषणा केली. यामध्ये राम जेठमलानी आणि विजयराजे सिंधिया यांना उपाध्यक्ष तर लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि सिकंदर बख्त यांना महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. सुरजभान आणि जे कृष्णमूर्ती यांना सचिव तर सुंदर सिंह भंडारी यांना कोषाध्यक्ष करण्यात आले.

वाजपेयीच का बनले पहिले अध्यक्ष?

वाजपेयी त्यावेळी राजकीय लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांची जोरदार भाषणे ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी जमायची. जनसंघात असतानाही त्यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. ज्यावेळी भाजपची स्थापना होत होती तेव्हा अशा नेत्याचा शोध घेतला जात होता जो पक्षाला देशभरात स्वीकार्य बनवील. विदेश मंत्री असतानाही वाजपेयींनी अनेक उल्लेखनीय कामे केली होती. 1980 मध्ये भाजपला पुढे घेऊन जाण्यासाठी संघाला अशा नेत्याची गरज होती जो निर्विवाद असेल आणि ज्याची भाषणं लोकांच्या मनाचा ठाव घेतील. वाजपेयी या दोन्ही निकषांना पूर्ण करत होते. विरोधी पक्षात सुद्धा वाजपेयी यांची स्वीकार्यता होती. त्यांच्या अंतोदय आणि विकासाच्या रोडमॅपचे विरोधी नेते सुद्धा कौतुक करायचे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आपल्या राजकीय करिअरची सुरुवात करणारे अटल बिहारी वाजपेयी यांना 1951 मध्ये जनसंघाचे सचिव नियुक्त करण्यात आले. 1957 मध्ये दुसऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी वाजपेयी मथुरा आणि बलरामपूर मतदरसंघातून निवडणुकीत उतरले होते. मथुरा मतदारसंघात वाजपेयींचा पराभव झाला मात्र बलराम पूर मतदारसंघात त्यांना विजय मिळाला. जबरदस्त वक्तृत्व शैली असल्याने वाजपेयी आपल्या पहिल्या कार्यकाळातच लोकप्रिय झाले.

1962 मधील निवडणुकीत बलराम पूर मतदारसंघातून त्यांना सुभद्रा जोशी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. 1967 मध्ये याच मतदारसंघातून वाजपेयी पुन्हा खासदार झाले. यानंतर पुढल्याच वर्षात त्यांना जनसंघाचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. वाजपेयींच्या नेतृत्वात पक्षाने 1971 मधील निवडणुका लढल्या आणि 14 जागा जिंकल्या. आणीबाणी मागे घेतली गेल्यानंतर निवडणुकीत वाजपेयी यांनी प्रचाराची कमान आपल्या हाती घेतली. त्यावेळी त्यांचे भाषण खूप ऐकले जात असायचे.

PDP candidates List : मेहबूबा मुफ्तींच्या मुलीची राजकारणात एंट्री, बिजबेहरामधून विधानसभा लढणार

अध्यक्षपदाच्या काळात अनेक रेकॉर्ड

अटल बिहारी वाजपेयी भाजपचे सहा वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. मात्र त्यांच्या कार्यकाळात त्यांना एकही निवडणूक जिंकता आली नाही. अशी कामगिरी करणारे वाजपेयी एकमेव अध्यक्ष आहेत. सन 1986 पर्यंत वाजपेयी अध्यक्ष होते. या दरम्यान युपीपासून राजस्थान आणि गुजरातपासून बंगालपर्यंत भाजपने निवडणुका लढल्या मात्र एकही निवडणुकीत यश मिळाले नाही. वाजपेयी यांच्या कार्यकाळात प्रत्येक राज्यात किमान एक निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला यश मिळवता आलं नाही. 1984 मधील लोकसभा निवडणुकीत तर भाजपाचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये एक तर आंध्र प्रदेशात एक जागा मिळाली. खुद्द वाजपेयी यांना सुद्धा विजय मिळवता आला नाही. 1984 नंतरही वाजपेयी दोन वर्षे अध्यक्ष होते. या काळातही भाजपला कोणत्याच राज्यात सरकार स्थापन करता आले नाही.

अध्यक्ष बनतानाच टाकली मोठी अट

सन 1980 मध्ये ज्यावेळी भाजप अस्तित्वात आला त्यावेळी अध्यक्ष बनण्याआधी वाजपेयींनी पार्टी नेत्यांसमोर एक अट ठेवली. सुब्रमण्यम स्वामी यांना पक्षात घेऊ नका अशी ही अट होती. स्वामी यांची पत्नी रोक्साना स्वामी यांनीच हा खुलासा त्यांच्या पुस्तकात केला आहे. अध्यक्ष बनल्यानंतर 1980 मध्ये वाजपेयींनी मुंबईत राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले. यामध्ये देशभरातील भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी वाजपेयींनी जे भाषण दिले होते ते आजही ऐकले जाते. या अधिवेशनात पंडित नेहरूंचे निकटवर्तीय एमसी छागला मुख्य पाहुणे होते. छगलांनी या अधिवेशनात वाजपेयी पंतप्रधान होतीलच असे भविष्यवाणी केली. या भाकिताच्या सोळा वर्षानंतर वाजपेयी देशाचे पंतप्रधान बनले.

सन 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या त्यावेळी विरोधी पक्षांचे नेते वाजपेयींवर टीका करत होते. या पराभवामुळे भाजपात वादळ उठले. हा पराभव असह्य झाल्याने कर्नाटकातील शिवमोग्गा येथे एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वाजपेयींनी थेट शिवमोग्गा गाठत कार्यकर्त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले होते. यानंतर पुढे दोन वर्षात वाजपेयींचं अध्यक्षपद गेले. त्यांच्याजागी लालकृष्ण अडवाणी यांनी ही जबाबदारी देण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube