नितीशकुमार साइडलाइनला जाणार; भाजप स्वतःचा मुख्यमंत्री बसविणार, मोदींनी चेहराही हेरलाय !

Bihar Election 2025: आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएला 205 जागांची आघाडी आहे. तर महागठबंधनचे पुरते पानिपत झालंय.

  • Written By: Published:
Will BJP Reject Nitish Kumar, Form Own Government With Samrat Chaudhary As CM

Bihar Election 2025: हिंदी बेल्टमधील राज्य असलेल्या बिहारमध्ये (Bihar Election 2025) एनडीएला (NDA)स्पष्ट बहुमत मिळतंय. आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएला 205 जागांची आघाडी आहे. तर महागठबंधनचे पुरते पानिपत झाले आहे. या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमारची जादू चाललीय आहे. पण नितीशकुमार ( Nitish Kumar) हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का ? हा मोठा प्रश्न आहे. कारण येथे आता भाजपला आपला मुख्यमंत्री बसू शकतो. हिंदी बेल्टमधील राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये भाजपला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे बिहारमध्ये आपल्याचा मुख्यमंत्री बसविण्याचे मनसुबे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांचे असणार आहे. त्यामुळे भाजप नितीशकुमार यांना साइडलाइनला टाकू शकतात. ( Bihar Election 2025: Will BJP reject Nitish Kumar, form own government with Samrat Chaudhary as CM?)


जागांचे गणित भाजपच्या बाजूने

सत्ताधारी एनडीए 202 जागांवर आघाडी आहे. या राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपने आतापर्यंत 92 जागांवर आघाडी घेतली आहे. तर मुख्यमंत्री नितिशकुमार यांचा जेडीयू पक्ष 82 जागांवर आघाडीवर आहे. तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्ष 21 जागांवर आघाडीवर आहे. तर जितेन मांझी यांचा नेतृत्वाखालील एचएएम हा पक्ष पाच जागांवर आघाडीवर आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक मोर्चा चार जागांवर आघाडीवर आहे. बिहार विधानसभा 243 सदस्यांची आहे. बहुमतासाठी 122 आमदारांची गरज आहे. भाजप, एलजेपी, एचएएम आणि आरएलपी यांच्या एकत्रित 122 जागा होत आहेत. त्यामुळे भाजप नितीशकुमार यांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करू शकते.

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही लाडक्या बहिणींचा जलवा; एनडीए बंपर बहुमताच्या उंबरठ्यावर


उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मोठ्या फरकाने जिंकून आले आहेत. ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सम्राट चौधरी यांच्या प्रचारसभेला गेले होते. तारापूरमधील सम्राट चौधरी यांच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली होती. सम्राट चौधरी जिंकून आल्यानंतर त्यांना मोठा माणूस करू, असे मोदी म्हणाले होते. त्यामुळे सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. पण मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सरकार स्थापन करताना भाजपने नवे चेहरे दिले आहेत. त्यामुळे येथे ही वेगळं गणित बघायला मिळू शकतं. परंतु लोकसभेचा जागांचे गणित बघता, नितीशकुमार यांना भाजपला साइडलाइन टाकू शकत नाही. परंतु राजकारणात काहीही घडू शकतं.


हा धक्का नाही! भाजप अन् निवडणूक आयोग यांचं हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं… राऊतांची बिहार निकालांवर पहिली प्रतिक्रिया


‘पलटूराम’ नितीशकुमार हे पुन्हा भाजपला सोडणार ?

नितीशकुमार यांना राजकारणातील पलटूराम म्हटलं जातं. तशी त्यांची खिल्लीही उडविले जाते. त्यात वेगळं राजकीय गणितही मांडल जात आहे. जदयू 82 जागांवर आघाडीवर आहे. आरजेडीला 26 जागा मिळू शकतात. काँग्रेसला चार, सीपीआयएमला, सीपीआय एमएल यांना प्रत्येकी एक जागा मिळताना दिसत आहे. हा आकडा 114 पर्यंत जावू शकतो. त्यावेळेस चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला बरोबर घेतले जावू शकते. त्यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. परंतु केंद्रात चिराग पासवान मंत्री आहेत. त्यामुळे असे गणित होऊ शकत नाही. पासवान यांनाही बिहारमध्ये आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यामुळे ते नितीशकुमारांबरोबर जाणार नाहीत.

follow us