PM Narendra Modi : महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य, मोदींची मोठी घोषणा
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मुंबईचा दौरा केला आहे. या दौऱ्यात मोदींनी 29000 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन केले आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली.
नरेंद्र मोदी म्हणाले की, तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हणालो होतो एनडीए सरकार (NDA Government) तिप्पट वेगाने काम करणार आहे आणि आता हे आता सर्वजण पाहत आहे. मुंबईला आर्थिक राजधानी (Financial Capital) बनवण्याचं लक्ष्य आहे असं देखील मोदी म्हणाले. याच बरोबर महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य आहे आणि महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात नंबर एक बनवणार असंही यावेळी मोदी म्हणाले.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराची या प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटी चांगली होईल. यांचा फायदा मोठ्या प्रमाणात राज्यातील तरुणाला होणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात रोजगाराची निर्मिती होणार आहे.
आमच्या सरकारने दोन तीन आठवड्यापूर्वी महाराष्ट्रासाठी वधावन बोर्डलाही स्वीकृती दिली आहे. ज्यामुळे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती राज्यात होणार आहे. असेही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या सरकारचे महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य आहे. तसेच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे शौर्याचे साक्षी किल्ले आहेत. इथे सह्याद्रीच्या रांगा आहेत. कोकणातील अथांग समुद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनवण्याचं लक्ष्य आहे. सध्या महाराष्ट्र भारतात विकासाची नवीन गाथा लिहिण्याचं काम करत आहे. याचे आम्ही साक्षीदार आहोत. असं मोदी म्हणाले.
तसेच गेल्या एक महिन्यापासून मुंबईत देश आणि विदेशातील गुंतवणूकदारांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. गुंतवणूकदारांनी एनडीए सरकारच्या तिसऱ्या टर्मचं उत्साहाने स्वागत केलं आहे. देशात एनडीए सरकार स्थिरता देऊ शकते याची लोकांना माहिती आहे. एनडीए सरकार तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम करणार आहे. अशी ग्वाही देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिली.
जयंत पाटलांचा शरद पवारांनी बळी घेतला, सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप
राज्याकडे गौरवशाली इतिहास
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्राला एक गौरवशाली इतिहास आहे. तसेच सशक्त वर्तमान आहे आणि समृद्धी भविष्याचं स्वप्न आहे. महाराष्ट्राकडे इंडस्ट्रीची पॉवर, कृषी पॉवर तसेच आर्थिक सेक्टरची ताकद आहे आणि या ताकदनेच मुंबईला देशाचा फायनान्शियल हब केलं आहे. असेही नरेंद्र मोदी म्हणाले.