पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा उघड, नवी मुंबई पोलिसांवर टाकला दबाव, काय आहे प्रकरण?
Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर (Pooja Khedkar) या सध्या भलत्याच चर्चत आहेत. त्यांचे विविध कारनामे समोर येत असून त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता त्यांचा आणखी एक कारनामा समोर आला. पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) अटक केलेल्या आपल्या एका नातेवाईकाला सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली.
Kirti Chakra: शहिद कॅप्टन अंशुमानच्या आई-वडिलांचे सुनेवर आरोप; कीर्तिचक्र घेऊन गेली माहेरी
नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला पूजा खेडकर यांच्या बाबत एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार प्रोबेशनरी ऑफिसर पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांवर त्यांच्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी दबाव आणला होता. स्टील चोरीच्या प्रकरणात या नातेवाईकाला अटक करण्यात आली होती. त्याला सोडण्यासाठी पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांच्या डीसीपींना फोन करून दबाव टाकला होता, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं पूजा खेडकर यांचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद निवडणुकीत सपा आणि एमआयएम ठरणार किंगमेकर, कोणाला देणार पाठिंबा?
पूजा खेडकर ह्या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. त्य नगर जिल्ह्यातील पाथर्डीमधील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दरम्यान, पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडली आहे. पुण्यात कार्यरत असताना पूजा खेडकर यांनी आपल्या खासगी गाडीवर सरकारी लाल दिवा लावल्याने त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे.
पूजा खेडकर यांच्यावर कोणते आरोप?
वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. अशातच त्यांचा पोलिसांवर दबाव टाकल्याचा कारनामा समोर आला.