आईचा कारवाईला विरोध! पूजा खेडकर यांना पोलिसांनी नोटीस धाडली, केंद्राकडून समितीही स्थापन

आईचा कारवाईला विरोध! पूजा खेडकर यांना पोलिसांनी नोटीस धाडली, केंद्राकडून समितीही स्थापन

IAS Pooja Khedkar News : पुण्यात परिवक्षाधीन असलेल्या आयपीएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या लाल दिव्याच्या खाजगी ऑडी कारची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना विरोध केल्याने पोलिसांनी पूजा खेडकर यांना नोटीस धाडलीयं. ऑडी कारची तपासणी करण्यास गेलेल्या पोलिसांना पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी सहकार्य न करता दमदाटी केल्याचं समोर आलं. यावेळी त्यांनी पोलिसांना बंगल्याच्या आतही येऊ दिले नाही. त्यानंतर पोलिसांनी खेडकर यांनी व्हॉट्सअपद्वारे ऑडी कार जमा करण्याबाबतची नोटीस धाडलीयं. तसेच पूजा खेडकर प्रकरणी केंद्र सरकारकडून अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आलीयं.

Bharuch Viral Video : नोकरीसाठी चेंगराचेंगरी, गुजरात मॉडेलवर काँग्रेसची टीका, पहा धक्कादायक व्हिडिओ

पूजा खेडकर यांच्या बंगल्यात झाकून ठेवण्यात आलेली ऑडी कार खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी वापरत होत्या. या कारवर त्यांनी ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावली होती. यासोबतच नारंगी रंगाचा दिवा देखील त्यांनी लावला होता. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कलम १७७ अंतर्गत कारवाई केलीयं.

केंद्र सरकारकडून समिती स्थापन..
मागील काही दिवसांपासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणी केंद्र सरकारकडून अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलीयं. ही समिती खेडकर यांच्याबाबत दोन आठवड्याच्या कालावधीनंतर अहवाल सादर करणार आहे.

श्रीमंताचा दिखावा पडणार महागात, IAS पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलीस करणार कारवाई

या कारवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिस खेडकर यांच्या बाणेर रस्त्यावरील बंगल्यासमोर गेले होते. मात्र, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी गेटच दरवाजा उघडण्यास नकार दिल्याने पोलिसांना खेडकर यांना व्हॉट्सअप नोटीस पाठवलीय. वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी MH -12 AR 7000 क्रमांकाच्या चारचाकी कारचा तपास करण्यासाठी सदरील गाडी पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश या नोटीशीत देण्यात आले आहेत.

दरम्यान, पुणे पोलिसांकडून ऑडी कारवर एमव्ही कायद्यांतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती समोर येताच पोलिस ऑडी कारच्या चौकशीसाठी पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी पोलिसांनी अनेकदा गेटची बेल वाजवूनही निवासस्थानातून कोणीही प्रतिसाद दिला नाही. बराच काळाच्या प्रतिक्षेनंतर पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर गेटजवळ येत मी सगळ्यांना आत टाकणार, या शब्दांत पोलिसांवर दमदाटी केल्याचं दिसून आलं.

पूजा खेडकरच्या आईने रौद्ररुप धारण केल्यानंतर पोलिसांना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांना निवासस्थानाबाहेर गेटच्या आत लावलेल्या ऑडी कारची आणि लाल दिव्याबाबतची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube