श्रीमंताचा दिखावा पडणार महागात, IAS पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलीस करणार कारवाई
IAS Pooja Khedkar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडेकरच्या (IAS Pooja Khedkar) अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस (Pune Police) आता पूजा खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहे.
पूजा खेडेकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर परवानगी न घेता लाल दिवा लावल्याने पुणे पोलीस त्यांच्यावर एमव्ही कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याची चर्चा आहे. पूजा खेडेकर यांनी त्यांच्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला होता तसेच या कारवर त्यांनी महाराष्ट्र शासनची पाटीही लावली होती. त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
तर दुसरीकडे पूजा खेडकर यांची बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे युपीएससी परीक्षेतून अधिकारी झाल्याचा आरोप होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून आता पुणे पोलीस देखील खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याने कारवाई करणार असल्याने पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. युपीएससी परीक्षेतून पूजा खेडकर यांची निवड झाली असून त्या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहे.
त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या काळात त्यांचा रुबाब, थाट, श्रीमंताचा दिखावा आता त्यांच्या चांगलाच अंगलट येत आहे. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र कार्यालय आणि गाडीची सुविधा नसते मात्र तरीही देखील पूजा खेडकर यांची त्यांच्या स्वतःच्या खासगी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावली होती.
तर दुसरीकडे माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून तिकडे त्यांनी स्वतःचा कार्यालय थाटले होते आणि या कार्यालयात त्यांनी फर्निचर देखील बदलला होता अशी माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत मविआचा किती जागांवर विजय? शरद पवारांच्या दाव्याने खळबळ
तर आता पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची तयारी करत आहे. परवानगी न घेता पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी ऑडी कारवर बिकन आणि महाराष्ट्र शासनची पाटी लावल्याने पुणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहे. पुणे पोलीस ही कारवाई मोटार वाहन नियम कायद्यांतर्गत करणार आहे.