पुणे पोलीस भरतीच्या तारखा जाहीर, ४९६ जागांसाठी ‘या’ दिवशी होणार मैदानी परीक्षा

पुणे पोलीस भरतीच्या तारखा जाहीर, ४९६ जागांसाठी ‘या’ दिवशी होणार मैदानी परीक्षा

Pune Police recruitment : गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीच्या (Police recruitment) तारखांची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Police Force) ४९६ रिक्त जागांसाठी आता ऐन पावसाळ्यात भरती होणार आहे. १९ जून ते २८ जून या कालावधीत मैदानी चाचणी परिक्षा घेण्यात येणार आहे.

Kalki 2898 AD: प्रभास- दिलजीतच्या ‘कल्की 2898 एडी’चे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला 

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई यांची ४४८ आणि चालक पोलीस शिपाई पदांची ४८ रिक्त पदे भरणे प्रस्तावीत आहेत. पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकूण ५३१४ उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले आहेत. तसेच पोलीस शिपाई पदासाठी एकूण ४२४०३ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. दरम्यान, आता पोलीस शिपाई चालक या पदासाठी मैदानी चाचणी परिक्षा दिनांक १९ जून २०२४ ते २८ जून २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी परिक्षा ही पारदर्शक आणि अचुक निर्णय होण्यासाठी मदत होणार आहे.

IAF Recruitment : भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीर पदासाठी भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज? 

पोलीस भरतीमध्ये उमेदवारानी विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँडसमन, तुरुंगविभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळया घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहावं लागू शकतं. त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होवू शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथके यांनी खालीलप्रमाणे सुचना दिलेल्या आहेत.

१. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल.

२. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल तर अश्या उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल.

३. काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.

४. पोलीस भरती २०२२-२३ मध्ये एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज केले आहेत आणि ज्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल तर अशा उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळया तारखा दिल्या जातील. याबाबत उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा. मात्र, याकरिता उमदेवारांना पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीवेळी सादर करावे लागतील.

५. उमेदवारांनी कोणत्याही आमीषास बळी पडू नये. याबाबत काही गैरप्रकार आढळून आल्यास थेट पोलीस अधीक्षक यांचेशी संपर्क साधु शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube