‘अग्नीवीरचा छोटा भाऊ…’; पोलीस भरतीच्या कंत्राटी पद्धतीवर रोहित पवारांचा निशाणा

‘अग्नीवीरचा छोटा भाऊ…’; पोलीस भरतीच्या कंत्राटी पद्धतीवर रोहित पवारांचा निशाणा

Rohit Pawar On Shinde Goverment :  केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्नीवीर नावाने कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला देशभरातून काही ठिकाणी विरोधही झाला. मात्र, सरकारने ही भरती प्रक्रिया सुरु केली असून आता पहिली तुकडी सैन्य दलात दाखलही झाली आहे. आता, महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायवर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, “राजकारणात पक्ष आणि नेते फोडाफोडीची नवीन प्रथा सुरु करुन महाराष्ट्राचं शालीन राजकारण भाजपाने मलीन केलं, त्याप्रमाणेच कंत्राटी पोलीस भरती करुन आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना? अशी शंका येते. लाखो युवा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असताना त्याकडं दुर्लक्ष करुन कंत्राटी भरती करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र निषेध!”

“अन् टोल नाका फुटला” : अमित ठाकरेंनी सांगितली मध्यरात्रीच्या खळ्ळखट्याकची हकीकत

यावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की,  ही प्रथा म्हणून अतिशय चुकीची आहे. एकदा कंत्राट भरती सुरु झाल्यावर थांबवता येत नाही. पोलीस प्रशासनामध्ये कंत्राट भरती होणं हे लोकांसाठी, पोलीस प्रशासनासाठी व युवांसाठी घातक आहे. तुम्हाला तात्पुरते लोकं घ्यायचे असतील तर तुम्ही होमगार्ड घेऊ शकता. यामुळे राज्य सरकार हे अग्नीवीरचा छोटा भाऊ राज्यात जिवंत करताय का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे, असे ते म्हणाले.

अमरावती जिल्हा बँकेत ‘एका’ मतासाठी ‘दोन’ कोटी : सत्ता हिरावलेल्या बच्चू कडूंवर यशोमती ठाकूरांचे आरोप

दरम्यान, मुंबई पोलीस दलासाठी ही भरती काढण्यात आली असून पोलीस अंमलदार ते सहायक उपनिरीक्षक या पदासाठी ही भरती होत आहे. सर्वप्रथम 3000 पदासांठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube