सरकार मेगा भरतीचे गाजर दाखवतंय; पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या शिलेदाराने सरकारला घेरलं

  • Written By: Published:
सरकार मेगा भरतीचे गाजर दाखवतंय; पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या शिलेदाराने सरकारला घेरलं

अहमदनगर – अंगावर खाकी वर्दी असावी, यासाठी लाखो तरूण पोल़ीस (Police) भरतीची तयारी करत आहे. पोलीस दलात आपलं नशीब आजमावणारी तरुणाई भरतीसाठी आस लावून बसली आहे. मात्र, सरकार फक्त मेगाभरतीचे गाजर दाखवत आहे. त्यामुळं अनेकांनी आत्महत्येचेही प्रयत्न केले. आता ३१ डिसेंबर पूर्वी पोलीस भरती प्रक्रियेची जाहिरात न निघाल्यास अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरतील. त्यामुळे येणाऱ्या ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी, अशी मागणी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Jitendra Awhad : ‘पक्षविस्तारात अजितदादांचा हातभार नाही’; आव्हाडांनी दिलं शरद पवारांना क्रेडिट ! 

याबाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर समवेत किरण दहिफळे, आदित्य काळे, भारत जाधव, भाऊसाहेब बामदले, राहुल बहिर, सोपान नाकाडे, जालिंदर कुसेकर, शिवदास मिसाळ, सुरेश सर्जे, आकाश कासार, भूषण बेरड, अभिषेक ढाकणे, अभिषेक पवार, आदीसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

PM Modi यांनी तेजस विमानातून मारला आकाशात फेरफटका, पाहा फोटो 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं की, जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस भरती करणारे उमेदवार हे पोलीस भरतीची तयारी करत आहे व सध्या गृह विभागातील २०२२ व २३ या सालची पदे रिक्त असल्यामुळे उमेदवारांची लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी. तसेच मागील ३ मार्च २०२३ रोजी या सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे. मात्र ३१ डिसेंबर पूर्वी पोलीस भरती प्रक्रियेची जाहिरात न निघाल्यास अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरतील. त्यामुळे येणाऱ्या ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी व उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यात यावी.

यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले की, प्रशासनाकडून म्हटले जाते की, पोलीस मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र प्रशासन भरती प्रक्रिया काही एक राबवत नाही. ग्रामीण भागातून तरुणाई मोठ्या कष्टाने शहरात येत भरतीचा अभ्यास करतेय यासाठी कुटुंबीयायांकडून देखील खर्च केला जातोय, मात्र भरती अभावी पालकवर्ग देखील चिंताग्रस्त झाला असल्याचे कळमकर म्हणाले.

सरकार फक्त मेगाभरतीचे गाजर दाखवत आहे. व प्रत्यक्षात कुठलीही भरती होत नसल्यानं अनेक युवकांना आत्महत्येचे देखील प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या अधिवेशनात लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे व विधानसभेत आमदार रोहित पवार हे ट्रिपल इंजन सरकार विरोधात पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात आवाज उठवणार असल्याचं कळमकर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube