IAF Recruitment : भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीर पदासाठी भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

IAF Recruitment : भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीर पदासाठी भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

IAF Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच भारतीय वायुसेनेने ‘अग्निवीर वायु’ (Agnivir Vayu) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.

राष्ट्रवादीपाठोपाठ पुणे शहरातील सहा जागांवर ठाकरे गटाचीही नजर… महाविकास आघाडीत कुस्ती सुरु 

शैक्षणिक पात्रता-
अग्निवीर वायु पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांनाी किमान 50% गुणांसह गणित, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र हे विषय घेऊन 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.
किंवा
50% सह अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

पगार-
निवड झालेल्या अग्निवीर वायु उमेदवारांना दरमहा रुपये 30,000/- दिले वेतन दिले जाणार आहे. या पगारात दरवर्षी वाढ करण्यात येणार आहे.

अर्ज फी –
उमेदवारांना अर्ज शुल्क रु 550/- + GST ​​भरावे लागेल.

मुंबई उत्तर पश्चिमच्या मतमोजणीत फेरफार; आदित्य ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप 

वयोमर्यादा-
उमेदवाराचा जन्म 3 जुलै 2004 ते 3 जानेवारी 2008 दरम्यान झालेला असावा. उमेदवाराने निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार केल्यास, नावनोंदणीच्या तारखेनुसार त्याची/तिची उच्च वयोमर्यादा 21 वर्षे असावी.

वैवाहिक स्थिती आणि गर्भधारणा-
केवळ अविवाहित उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच चार वर्षांच्या सेवा कालावधीत गर्भवती राहू नये. अग्निवीर वायु भरतीनंतर एखाद्या महिलेला नियमित शिपाई म्हणून हवाई दलात सामील व्हायचे असले तरी या काळात ती गर्भवती राहू शकत नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 8 जुलै 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 जुलै 2024

अर्ज कसा करावा?
वायुसेनेच्या अग्निवीर वायु पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या अर्जासोबत
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अर्ज केल्यानंतर, उमेदवारांची निवड विविध परीक्षांद्वारे केली जाईल.
उमेदवारांनी वर नमूद केलेल्या नोकऱ्यांसाठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाइट लिंक –
https://agnipathvayu.cdac.in/AV/

अधिसूचना –

https://static.tnn.in/photo/msid-111047983/111047983.jpg

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज