मुंबई उत्तर पश्चिमच्या मतमोजणीत फेरफार; आदित्य ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप
Aditya Thackeray On Election Commission: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात (Mumbai North West Lok Sabha)शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar)यांचा फक्त 48 मतांनी पराभव झाला. त्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर (Rabindra Waikar)यांनी बाजी मारली. या निकालावरुन शिवसेना ठाकरे गटानं निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Government Schemes : शेत जमिनीवर फळझाड लागवड कार्यक्रम योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईकरांनी हुकूमशाहीच्या विरोधात निकाल दिला आहे, तो जगजाहिर आहे. कोर्टाची लढाई तर आम्ही जिंकणारच आहोत.लोकसभा निवडणूक ही पारदर्शक झाली का? विशेष म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झालेली निवडणूक आणि त्याची मतमोजणी ही पारदर्शकपणे पार पडली का? असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Ghati Hospital: रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कुठे ना कुठेतरी घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजे, मतमोजणी पारदर्शकपणे झाली का? त्याचबरोबर ही मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर कोणाचे काही आक्षेप असतील तर त्यांच्या शंकांचे निरसन करणे हे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम असतं. पण त्यांनी तसं केलं आहे का? असा सवालही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोग एका पक्षाच्या सांगण्यावरुन काम करत आहे. इलेक्शन कमिशनने इतकी गडबड करुनही इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले आहे. ही गडबड झाली नसती तर सरकार बदलले असते, असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.