एक अ‍ॅनाकोंडा अन् दोन विषारी साप; आदित्य ठाकरेंची एका वाक्यात खरमरीत टीका…

सत्ताधारी पक्षात एक अ‍ॅनाकोंडा अन् दोन विषारी साप असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यंत्र्यांवर केलीयं.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeay On Devendra Fadanvis : सत्ताधारी पक्षात एक अ‍ॅनाकोंडा अन् दोन विषारी साप असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeay) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलायं. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो विमानांच्या गोंधळामुळे मी उद्धव ठाकरेंना गाडी पाठवतो असल्याचं म्हटलं होतं, त्यावरुन आता आदित्य ठाकरेंनी सडकून टीका केलीयं.

व्यापाऱ्याची 30 कोटींची फसवणूक; प्रसिद्ध चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना अटक

पुढे बोलताना ते म्हणाले, समृद्धी महामार्गाने अधिवेशनाला येणारे येऊ शकतात पण इंडिगोच्या गोंधळामुळे अनेक लोकांचे हाल सुरु आहेत. एका जोडप्याने काल डिजिटल लग्न केलंय. हे फक्त बोलायला चांगल आहे. सत्ताधारी भाजप आणि दोन मित्रपक्षामध्ये एक अॅनाकोंडा अन् दोन विषारी साप आहेत. सगळं काही ढापायचं ही त्यांची वृत्ती आहे, आम्ही पदांसाठी भांडत नाहीत. लोकशाहीतल्या पदांसाठी आम्ही भांडत आहोत. लोकशाहीतली पदे नाही ठेव अन् खोटी पदे ठेवत आहेत. तुमच्याकडे जर सगळं काही आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी थेट कर्जमाफीची तारीखच केली जाहीर!

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही संख्याबळ मिळवा मग विरोधीपक्षनेते पद घ्या,अशी विरोधकांवर टीका केली होती. माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी शिंदेंना चोख प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, तुमच्याकडे संख्याबळ आहे मग तुम्ही दोन पदे का निर्माण केलीत? निवडणूक आयोगाने संख्याबळ मिळाल्याने दोन पदे का निर्माण केली? असं ठाकरे म्हणाले आहेत.

<a href=”https://letsupp.com/maharashtra/dipali-patil-case-rohit-pawar-conspiracy-to-defame-bjp-by-making-baseless-allegations-272966.html”>संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचे रोहित पवारांचे षडयंत्र

दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलायं. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस स्वत: दोन प्रायव्हेट चार्टड फ्लाईट करुन आले आहेत. फडणवीसांनी हे असं काही काढू नये, काढायला गेलं तर खूप काही निघू शकतं, असा थेट इशाराच त्यांनी फडणवीसांना दिलायं.

follow us