Government Schemes : शेत जमिनीवर फळझाड लागवड कार्यक्रम योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?

Government Schemes : शेत जमिनीवर फळझाड लागवड कार्यक्रम योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?

Government Schemes : शेत जमिनीवर (Farm)फळझाड लागवड कार्यक्रम योजनेमार्फत (Fruit Tree Plantation Program Scheme)अधिकाधिक क्षेत्रावर फळबाग लागवड करून रोजगार निर्मिती (Employment generation)करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा (Farmer)आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना राबविली जाते.

मोठी बातमी : आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंना जबर धक्का

या प्रवर्गासाठी योजना लागू :
अ) अनुसुचित जाती
ब) अनुसुचित जमाती
क) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
ड) भू-सुधार योजनेचे लाभार्थी
इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
फ) कृषि कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्प भू-धारक व सीमांत शेतकरी
ग) अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी

Box Office: कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ची दमदार सुरूवात, पण थिएटरमध्ये कोकणी ‘मुंज्या’चाच बोलबाला

योजनेच्या प्रमुख अटी :
▪ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉबकार्ड असणे आवश्यक.
▪ ग्रामसभेमध्ये लाभार्थी निवड होणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे : लाभार्थींच्या नावावर असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ उतारा.

लाभाचे स्वरूप असे : वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार 100 % दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे व 75 टक्के झाडे जिवंत असल्यास अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहिल.

या ठिकाणी संपर्क साधावा : संबधित मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालय.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज