मोठी बातमी, LOC जवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, ‘या’ संघटनेने स्वीकारली जबाबदारी

Line of Control : जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu and Kashmir) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पुंछ जिल्ह्यातील (Poonch District) नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट झाला असून या स्फोटमध्ये एका अग्निवीराला (Agniveer) वीरमरण आले आहे तर दोन जवान जखमी झाले आहे. याबाबत भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंगदरम्यान हा स्फोट झाला आहे. तर या स्फोटची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटन लष्कर ए तोयबाची प्रॉक्सी असलेल्या टीआरएफने स्वीकारली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील सलोत्री गावामध्ये व्हिक्टर पोस्टजवळ भारतीय लष्करातील जाट रेजिमेंटचे नायब सुभेदार हरी राम, हवालदार गजेंद्र सिंह आणि अग्निवीर ललित कुमार हे चौक्यांजवळून दुपारी गस्त घालत होते. मात्र अचानक दुपारी 12 च्या सुमारास हा स्फोट झाला आणि या स्फोटमध्ये ललित कुमार यांना वीरमरण आले. तर सुभेदार हरी राम आणि हवलादार गजेंद्र सिंह गंभीर झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी
तर दुसरीकडे पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी देखील टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठीकाणांवर हवाई हल्ले केले होते.