Agniveers New Rules : अग्निवीरांसाठी नवीन नियम! पर्मनंट सैनिक होण्यापूर्वी करता येणार नाही लग्न

Agniveers New Rules : येणाऱ्या दिवसात तुम्ही देखील अग्रिवीर होण्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Agniveers New Rules

Agniveers New Rules : येणाऱ्या दिवसात तुम्ही देखील अग्रिवीर होण्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अग्रिवीर योजनेअंतर्गत पर्मनंट सैनिक होण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. या नवीन नियमांनुसार आता अग्रिवीर योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना पर्मनंट सैनिक होण्यापूर्वी लग्न करता येणार नाही. जर अग्निवीर या प्रक्रियेदरम्यान किंवा पर्मनंट सैनिक होण्यापूर्वी लग्न करत असेल तर त्यांना पर्मनंट सेवेसाठी अपात्र ठरवले जाईल. पर्मनंट होण्यापूर्वी लग्न करणाऱ्या सैनिकांना अग्निवीर पर्मनंट सेवेसाठी अर्ज करू शकणार नाहीत किंवा निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत.

नियम काय?

नवीन नियमानुसार, अग्रिवीर (Agniveers) भारतीत सैन्यात पर्मनंट सैनिक म्हणून नियुक्त झाल्यानंतरच लग्न करु शकतात. त्यामुळे पर्मनंट नियुक्तीचे अंतिम निकाल येईपर्यंत त्यांना लग्रापासून दूर राहावे लागेल मात्र यासाठी जास्त वेळ लागणार नाही. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर, अग्निवीरांना पर्मनंट प्रक्रिया (Agniveers New Rules) पूर्ण होण्यासाठी सुमारे चार ते सहा महिने वाट पहावी लागेल.

अग्निवीर योजना

अग्निवीर योजना (Agniveer Scheme) 2022 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भरती झालेली पहिली तुकडी आता त्यांची चार वर्षांची सेवा पूर्ण करत आहे. अग्निवीरांच्या 2022 च्या तुकडीतील सेवा कालावधी जून आणि जुलै 2026 च्या सुमारास संपेल असा अंदाज आहे. पहिल्या तुकडीमध्ये अंदाजे 20,000 तरुण होते, जे आता निवृत्त होत आहेत. या अग्निवीरांपैकी सुमारे 25 टक्के लोकांना भारतीय सैन्यात पर्मनंट सैनिक होण्याची संधी मिळेल.

निवड शारीरिक तंदुरुस्ती, लेखी परीक्षा आणि इतर निकषांवर आधारित असेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि कामगिरीवर आधारित असेल. यशस्वी अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी सेवा दिली जाईल. सेवा पूर्ण झाल्यानंतर पर्मनंट सैनिक होण्याची प्रक्रिया लगेच पूर्ण होत नाही. अग्निवीरांना अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर संपूर्ण निवड प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया साधारणपणे 4 ते 6 महिने चालते. दरम्यान, अंतिम यादी जाहीर होईपर्यंत कोणत्याही अग्निवीराने लग्न करू नये असे लष्कराने स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे लष्कराने असे म्हटले आहे की जर अग्निवीर या कालावधीत लग्न करत असेल तर त्यांना पर्मनंट सेवेच्या शर्यतीतून अपात्र ठरवले जाईल. अशा उमेदवाराचा अर्ज त्यांच्या पात्रतेकडे दुर्लक्ष करून स्वीकारला जाणार नाही. म्हणून, अग्निवीरांना हा नियम गांभीर्याने समजून घेण्याचा आणि त्याचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मोठी बातमी! सोनिया गांधींची प्रकृती खालावली; सर गंगाराम रुग्णालयात दाखल 

पर्मनंट सैनिक म्हणून निवड झालेल्या अग्निवीरांना त्यांच्या नियुक्तीनंतर लग्न करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. एकदा ते पर्मनंट सैन्यात सामील झाले की, ते त्यांच्या सोयीच्या आणि पसंतीच्या कोणत्याही वेळी लग्न करू शकतात. हे निर्बंध आता त्यांना लागू राहणार नाहीत.

follow us