मोठी बातमी; सोनिया गांधींची प्रकृती खालावली; सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील सर गंगा राम

Sonia Gandhi

Sonia Gandhi : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना मंगळवारी सकाळी गंगा राम रुग्णालयात प्रकृती बिघडल्याने दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत काँग्रेस पक्षाने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असून त्यांना नियमित तपासणी आणि उपचारांसाठी वेळोवेळी रुग्णालयात नेण्यात येते. तर आज देखील त्यांना नियमित तपासणीसाठी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांनी 2017 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत.

बांगलादेशमध्ये IPL वर बंदी; BCCI ला होणार नुकसान? जाणून घ्या सर्वकाही

follow us