बांगलादेशमध्ये IPL वर बंदी; BCCI ला होणार नुकसान? जाणून घ्या सर्वकाही
Bangladesh Banned IPL Live Telecast : भारत आणि बांगलादेशमध्ये सुरु असणाऱ्या राजकीय तणावामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयपीएल
Bangladesh Banned IPL Live Telecast : भारत आणि बांगलादेशमध्ये सुरु असणाऱ्या राजकीय तणावामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयपीएल 2026 साठी बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानवर बंदी घातली आहे. बीसीसीआयच्या या कारवाईनंतर आता बांगलादेशने देखील मोठा निर्णय घेत बांगलादेशमध्ये आयपीएल 2026 च्या प्रसारण आणि थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) घेतलेल्या या निर्णयानंतर आता बीसीसीआयचे मोठे नुकसान होणार अशी चर्चा सोशल मीडियावर जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे बांगलादेशने घेतलेल्या या निर्णयाचा कोणताही परिणाम बीसीसीआयवर (BCCI) होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
मला वाटत नाही की बांगलादेशमध्ये आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्याच्या या निर्णयाचा कोणताही मोठा परिणाम होईल. याचा बीसीसीआयच्या महसुलावर परिणाम होणार नाही किंवा ते प्रसारकांना देत असलेल्या देयकांमध्येही बदल होणार नाही. गेल्या हंगामात फक्त दोन किंवा तीन बांगलादेशी खेळाडू आयपीएलमध्ये (IPL 2026) सक्रिय असल्याने प्रेक्षकांच्या संख्येवर फारसा परिणाम होणार नाही असं डी अँड पी अॅडव्हायझरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय भागीदार संतोष एन म्हणाले.
बांगलादेशच्या या निर्णयामुळे प्रसारकांच्या महसुलावर फारसा परिणाम होणार नाही. इतर ब्रँडच्या प्रवेशामुळे कोणताही महसूल तोटा भरून काढला जाईल. आयपीएल सातत्याने वाढत आहे आणि विद्यमान प्रायोजक येत्या हंगामात त्यांच्या जाहिराती वाढवू शकतात असं टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन चंद्रमौली म्हणाले.
बिनविरोधात निवडून आलेल्या उमेदवारांचे भविष्य ठरणार; निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय?
डिस्ने स्टार आणि व्हायाकॉम 18 सोबत 48,390.32 कोटींचा करार
बीसीसीआयने 2023 ते 2027 या कालावधीसाठी डिस्ने स्टार आणि व्हायाकॉम 18 सोबत 48,390.32 कोटी (यूएस $1.2 अब्ज) किमतीचा मीडिया हक्क करार केला होता. टी-स्पोर्ट्स बांगलादेशसाठी आयपीएल सामन्यांचे प्रसारण करत होते आणि व्हायाकॉम 18 सोबत हा करार होण्याची शक्यता आहे, कारण जागतिक हक्क रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्हायाकॉम 18 कडे होते. या कराराचे अचूक आकडे उपलब्ध नाहीत, परंतु असे म्हटले जात आहे की जागतिक हक्कांपैकी फक्त 2% बांगलादेशी प्रसारकांशी करार करण्यात आले होते, जे 1,3000 कोटी (13 अब्ज रुपये) इतके होते. बांगलादेशसोबतचा पाच वर्षांचा करार केवळ 20 ते 26 कोटी (200 दशलक्ष ते 260 दशलक्ष रुपये) किमतीचा होता.
