कोट्यावधींची प्रॉपर्टी तरी नॉन क्रिमिलेअरमधून परीक्षा; IAS पूजा खेडकरा्ंवर थेट केंद्रातून कारवाई होणार

कोट्यावधींची प्रॉपर्टी तरी नॉन क्रिमिलेअरमधून परीक्षा; IAS पूजा खेडकरा्ंवर थेट केंद्रातून कारवाई होणार

IAS Pooja Khedkar exam as non creamy layer having 42 cores property : नुकतीच वाशिममध्ये बदली झालेल्या आणि पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या वादग्रस्त श्रीमती पुजा खेडकर (Pooja Khedar) यांच्या प्रकरणामध्ये नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यात आता तिच्या नावावर जवळजवळ बावीस करोडची प्रॉपर्टी आहे आणि तिला 45 लाख रुपये वार्षिक यातून उत्पन्न येतं तरी देखील तीने नॉन क्रिमिलेअरमधून परीक्षा दिली असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर खेडकरच्या गैरव्यवहारांवर पंतप्रधान कार्यालाय आणि लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (IBSNAA) ने अहवाल मागवला असून यावर लवकरच कारवाईची शक्यता आहे.

कोट्यावधींची प्रॉपर्टी तरी नॉन क्रिमिलेअरमधून परीक्षा…

पूजा खेडकर प्रकरणामध्ये अजून एक माहिती पुढे आली आहे. समाज माध्यामांवर ती माहिती व्हायरल होत आहे. त्यामध्ये उल्लेख केल्यानुसार त्यांच्या नावावर जवळजवळ बावीस कोटींची प्रॉपर्टी आहे आणि त्यांना 45 लाख रुपये वार्षिक यातून उत्पन्न येतं. बावीस कोटींची स्थायी मालमत्ता आहे. सदरची माहिती ही पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि सरकारी वेबसाईटवर टाकलेली आहे.

जर तुम्ही पासपोर्ट काढायला गेला, छोट्या गोष्टी करायला गेल्या. तरी तुमची चौकशी पोलीस स्टेशन मोठ्या प्रमाणावर करते. मग इतकं उत्पन्न असताना या खेडकर यांना कसं काय ओबीसी सर्टिफिकेट मिळालं? यूपीएससीने थोडी पण चौकशी केली नाही? एथिक्स कमिटी काय करत होती? त्यांचे उत्पन्न आणि याची मालमत्ता महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरी किंवा सीनियर आयएएस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त आहे. अशी माहिती सध्या समाज माध्यमांमध्ये येत आहे. सवाल उपस्थित केले जात आहेत.

‘Bad News’ सिनेमातील विकी-तृप्तीचे इंटिमेट सीन कसे शूट केले? करण जोहरने सांगितला सेटवरील अनुभव

दरम्यान पुजा खेडकर संबंधात पंतप्रधान कार्यालाय आणि लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (IBSNAA) ने महाराष्ट्र सरकारकडून वादग्रस्त IAS अधिकारी डॉ पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल मागवला आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अकादमीमध्ये कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याला एक वर्षाचं प्रशिक्षण दिलं जात. त्यामुळे आता पुजा खेडकरवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या थाटाला पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही वैतागले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूच्याच केबिनची मागणी करणे, वरिष्ठांचे अँटी चेंबर बळकावणे, घराच्या मागणीवर अडून बसणे, शिपाई आणि अन्य मदतनीसांची मागणी करणे, ऑडीसारख्या अलिशान गाडीतून ऑफिसला येणे, शिवाय याच खाजगी गाडीला अंबर दिवा बसवून घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे, अशा थाटात खेडकर यांचा पुण्यात वावर होता. अखेर शासनाने त्यांची बदली करावी अशी मागणीच दिवसे यांनी केली. त्यानुसार खेडकर यांची वाशिमला रवानगी झाली.आता खेडकर यांचे अन्यही काही प्रताप समोर येत आहेत.

आयुक्त पंकज जावळेंच्या अडचणी आणखी वाढल्या, कोर्टाने जामीन फेटाळला

त्यामध्ये वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. तसेच नुकतीच बदली झालेल्या वाशिमला देखील त्या रूजू झालेल्या नाहीत. खेडकर हे व असे अनेक कारनामे समोर येत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube