आयुक्त पंकज जावळेंच्या अडचणी आणखी वाढल्या, कोर्टाने जामीन फेटाळला
Ahmednagar Municipal Corporation Commissioner Bail denied : अहमदनगरच्या महानगरपालिकेचे आयुक्त (Municiple Corporation Commissioner) लाच मागितल्याच्या गुन्ह्यात आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Jawale) यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला (Bail denied) आहे. त्यांच्या अटकपूर्व अर्जावर न्यायालयात पाच दिवस सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.
Indian 2: कमल हसनचा ‘इंडियन 2’ चित्रपट वादग्रस्त! ‘या’ कारणांमुळे बंदी घालण्याची मागणी
अहमदनगर शहरातील बांधकाम व्यवसायाकडे आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणामध्ये जामीनासाठी जावळे यांनी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन नाकारला आहे. दरम्यान जावळे हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्याच काम सुरू आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक पंकज जावळे आणि कर्मचारी या दोघांनी नगरमधील एका बिल्डरला बांधकाम परवानगी देण्यासाठी तब्बल आठ लाखांची लाच मागितल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पंकज जावळे आणि श्रीधर देशपांडे फरार झालेले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु असून जावळे यांनी वकीलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
IAS पूजा खेडकरला महाराष्ट्राच्या प्रश्नांचीही उत्तरे येईनात; मॉक इंटरव्ह्युचा Video समोर
मात्र त्यांच्या या अटकपूर्व अर्जावर न्यायालयात पाच दिवस सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. या प्रकरणामध्ये जामीनासाठी जावळे यांनी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन नाकारला आहे.