पुणे महानगरपालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले, विक्रम कुमार यांच्यावर एमएमआरडीएची जबाबदारी

  • Written By: Published:
पुणे महानगरपालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले, विक्रम कुमार यांच्यावर एमएमआरडीएची जबाबदारी

IAS Rajendra Bhosale appointed PMC Commissioner : राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आता पुणे महानगरपालिका आयुक्तपदी (Pune Municipal Corporation) राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर एमएमआरडीए (मुंबई) अतिरिक्त आयुक्तपदी जबाबदारी देण्यात आली आहे.

Pune : टायरमध्ये घालण्याचा इशारा देणाऱ्या अजित पवारांकडून मोक्काच्या आरोपीची सुटका

डॉ. राजेंद्र भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे अधिकारी आहेत. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनीच भोसले यांना पुणे महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या पदावर बसविले आहे. विक्रम कुमार हे गेल्या चार वर्षांपासून पालिकेची आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांची नेमणूक झाली होती. विक्रम कुमार यांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या बदलीची चर्चा होती. गेल्या आठवड्यात महानगरपालिकेचे सुमारे अकरा हजार कोटींचे बजेट त्यांनी सादर केले होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहे. त्या आधीच गुरुवारी विक्रम कुमार यांच्या बदलीचा आदेश निघाला आहे. त्यांच्या जागी आयएएस अधिकारी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली आहे.

शिंदे गटाला खिंडार पडणार, CM शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार; असीम सरोदेंचा मोठा दावा

तर आयएएस अधिकारी लहू माळी आणि कैलास पगारे यांचीही बदली झाली आहे. लहू माळी यांची मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, संशोधन आणि विकास संचालक म्हणून बदली झाली आहे. तर कापूस उत्पादक विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांना एकात्मिक आदिवासी विकास योजनेच्या संचालकपदी नियुक्ती मिळाली आहे.

नगर-मुंबई-पुणे

राजेंद्र भोसले हे अहमदनगरचे जिल्हाधिकारी होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या वर्षभरात ते पुण्याचे महानगरपालिका आयुक्त म्हणून बदलून आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube