Pune : टायरमध्ये घालण्याचा इशारा देणाऱ्या अजित पवारांकडून मोक्काच्या आरोपीची सुटका

Pune : टायरमध्ये घालण्याचा इशारा देणाऱ्या अजित पवारांकडून मोक्काच्या आरोपीची सुटका

Ajit Pawar : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचा आलेख हा वाढतच आहे. कोयते गॅंग, ड्रग्ज तस्कर ते दहशतावादी कनेक्शन यामुळं शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याची पालकमंत्री अजित पवारांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी अलीकडेच कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी  (Ajit Pawar)जाहिररित्या माफीही मागितली होती. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी कोयता गॅंगला टायरमध्ये घालण्याचा इशाारा त्यांनी दिला. परत मुलांना सोडवा म्हणून कुणी येऊ नका, असंही त्यांनी बजावलं. मात्र, आता अजित पवारांच्या कथणी आणि करणीत फरक असल्याचं समोर आलं आहे.

भाजपाचा रिपीट फॅक्टर, काँग्रेसचे ‘सिनियर कार्ड’; दिग्गजांना निवडणुकीशिवाय नाही पर्याय

त्याचं झालं असं की, भिगवण पोलिसांनी नुकताच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आनंद हॉटेलवर छापा टाकला. आणि वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत पोलिसांनी ३ मुलींची सुटका केली आणि पाच जणांवर गुन्हे दाखल केले होते. हॉटेलमालक नामदेव बाळासो बंडगर याच्यासह पाच जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. मात्र, आता अजित पवारांनी आपला कार्यकर्ता असलेल्या विश्वास नाना देवकाते यांच्या आग्रहाखातर मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या नामदेव बाळासो बंडगरची सुटकी केली. नागदेव बंडगर हा आरोपी विश्वास नाना देवकात यांचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालविल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, अजित पवार यांनी ग्रामीण पोलिसांना दम भरला आणि नामदेव बंडगरला मोक्कातून अलगद बाहेर काढलं.

मोठी बातमी! तेलंगणाचे माजी CM केसीआर यांच्या मुलीला अटक; दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई 

एकीकडे अजित पवार हे सार्वजनिक जीवनात अत्यंत कडक शिस्तीने वागतात. पुण्यातून गुन्हेगारीला संपवून टाकू, असं सांगतात. अन् दुसरीकडे जवळचे कार्यकर्ते अगदी वेश्या व्यवसायात गुंतलेले असले तरी त्यांना अभय देतात. त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. त्यामुळं अजितदादांच्या मनात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न सुज्ञ जनता विचारत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube