अजित पवारांनी महारोजगार मेळावा भरवला : आप नेत्याने ‘पोलखोल’ केली

अजित पवारांनी महारोजगार मेळावा भरवला : आप नेत्याने ‘पोलखोल’ केली

Baramati Namo Great Job fair : पंधरा हजार नव्हे, दीडशेच! तेही नोकरी नव्हे तर ट्रेनी आणि तेही कोणत्या कंपनीसाठी आणि किती ते सांगता येणार नाही. शासन प्लेसमेंट एजन्सी मार्फत भरती का करत आहे? या एजन्सीज सामाजिक कार्य करत नसतात तर अशी भरती करताना नोंदणी फी बरोबरच उमेदवाराच्या पगारातील हिस्सा सुद्धा उकळत असतात. शासन रोजगार कुणाला उपलब्ध करून देऊ पहातयं? बेरोजगार तरूणांना की प्लेसमेंट एजन्सींना? असा सवाल करत आम आदमी पार्टीचे नेते विजय कुंभार यांनी (Vijay Kumbhar) राज्य सरकारच्या नमो रोजगार मेळाव्याची (Baramati Namo Great Job Fair) पुन्हा पोलखोल केली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज या महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

कुंभार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की पंधरा हजार नव्हे, दीडशेच! तेही नोकरी नव्हे तर ट्रेनी आणि तेही कोणत्या कंपनीसाठी आणि किती ते सांगता येत नाही. कालच्या नमो रोजगार मेळाव्यावरील माझ्या ट्विटनंतर संबंधित कंपनीच्यावतीने खुलासा करण्यात आला. काल मी बारामतीलमधील नमो महारोजगार मेळाव्यातून 43 हजार लोकांना रोजगार मिळेल असे सांगितले जात असले तरी त्यातील जवळपास 30 हजार जागा या नोकऱ्या नसून फक्त ट्रेनी पदे आहेत. यातील एकच कंपनी 15 हजार ट्रेनी घेणार आहे, अशा अर्थाचे ट्विट केले होते. सदर कंपनी ही प्लेसमेंट एजन्सी आहे. इतर कंपन्यांच्या पदसंख्येवरील किती शून्य कमी झालेत माहिती नाही.

शासन प्लेसमेंट एजन्सीमार्फत का भरती करत आहे? या संस्था सामाजिक कार्य करत नसतात. तर अशी भरती करताना नोंदणी फी बरोबरच उमेदवारांच्या पगारातील हिस्सा सुद्धा उकळत असतात. शासन रोजगार कुणाला उपलब्ध करून देऊ पाहतंय? बेरोजगार तरुणांना की प्लेसमेंट एजन्सीजना? असा सवाल आप नेते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.

नोकऱ्यांऐवजी ट्रेनी पदे तर कंपन्याही इंटरनेटवर नाही; आपकडून नमो महारोजगार मेळाव्याची पोलखोल

राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा हा कार्यक्रम येत्या दोन मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे या जिल्ह्यातील खासदारांनाही या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज