मनपा आयुक्त पंकज जावळेंचा जामीन लांबणीवर; पुढील सुनावणी 8 जुलैला!

मनपा आयुक्त पंकज जावळेंचा जामीन लांबणीवर; पुढील सुनावणी 8 जुलैला!

Pankaj Jawale : अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे (Pankaj Jawale) आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे (Shreedhar Deshpande) यांच्यावर लाच लुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आलीयं. बांधकाम व्यावसायिकाकडून 8 लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप जावळे आणि देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आलायं. या प्रकरणी पंकज जावळे फरार असून त्यांनी आज न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलायं, मात्र एसीबीने तपासाची कागदपत्रे सादर करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 जुलैला होणार आहे.

मोठी बातमी! मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर दिवसाढवळ्या गोळीबार, चंद्रपुरात एकच खळबळ

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक पंकज जावळे आणि कर्मचारी या दोघांनी नगरमधील एका बिल्डरला बांधकाम परवानगी देण्यासाठी तब्बल आठ लाखांची लाच मागितल्याचे समोर आले आलेयं. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पडताळणीत दोघांनी लाच मागितल्याचे समोर आले. परंतु त्यांनी लाच स्वीकारलेली नाही. लाच मागितल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जावळेंचे वकील अॅड. गुगळे न्यायालयात काय म्हणाले?
आयुक्त जावळे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप आहे, मात्र ज्या कामासाठी लाच मागितली ती फाईल आधीच मंजूर करण्यात आलेली आहे. ज्या व्हाइस रेकॉर्डिंगच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलायं, त्यात आयुक्त ‘बोलून घ्या’, असे म्हणालेले ऐकू येत आहे. त्यामुळे ‘बोलून घ्या’ म्हटले याचा अर्थ लाच मागितली असा होऊ शकत नाही, असाही युक्तिवाद अ‍ॅड. गुगळे यांनी केलायं. सरकारचे म्हणने येऊपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणीही अ‍ॅड. गुगळे यांनी केलीयं.

मी 20-20 खेळू शकतो, गोऱ्हेंनी फार न्याय दिला नाही; निलंबन मागे घेताच ठाकरेंच्या वाघाची ‘डरकाळी’

न्यायालयाने काय आदेश दिले?
पंकज जावळे यांच्यावर बांधकाम व्यावसायिकाकडून 8 लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पंकज जावळे आणि श्रीधर देशपांडे फरार झालेले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु असून जावळे यांनी वकीलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने लाचलुचपत विभागाला तपासाची कागदोपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सरकारचे स्पष्टीकरण येऊपर्यंत पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन लांबणीवर गेला आहे.

दरम्यान, एसीबीकडे तक्रार करणारी व्यक्ती ही भागीदारांसह 4K रियल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करते. त्यांनी नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. या प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिकेकडे ऑनलाइन अर्ज दाखल केला होता.

आयुक्त डॉ. पंकज जावळे व लिपिक श्रीधर देशपांडे यांनी बिल्डरकडे 9 लाख 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदाराने लाच न देता जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. देशपांडे यांनी मनपा आयुक्त जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत गेल्या आठवड्यात निष्पण झाले. आपल्याविरुद्ध तक्रार झाली असल्याची कुणकुण लागल्यानंतर दोघांनी गुरुवारी लाच स्वीकारली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube