अहमदनगर मनपाचे आयुक्तच लाचखोरीच्या जाळ्यात ! कर्मचाऱ्यामार्फत बिल्डरला आठ लाख मागितले
अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक पंकज जावळे (Pankaj Jawale) आणि कर्मचारी या दोघांनी नगरमधील एका बिल्डरला बांधकाम परवानगी देण्यासाठी तब्बल आठ लाखांची लाच मागितल्याचे समोर आले आलेय. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (ACB) पडताळणीत दोघांनी लाच मागितल्याचे समोर आले. परंतु त्यांनी लाच स्वीकारलेली नाही. लाच मागितल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येत असल्याचे एसीबीचे अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त जावळे व कर्मचारी दोघेही फरार आहेत. त्यांचा पथक शोध घेत आहे. (Bribery of Ahmednagar municipal commissioner and employee! Eight lakhs were asked from the builder)
रुपेरी पडद्यावर इतिहासातलं सुवर्णपान उलगडणार; आकर्षक मोशन पोस्टरने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष
याबाबत एसीबीकडे तक्रार करणारी व्यक्ती ही भागीदारांसह 4K रियल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करते. त्यांनी नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. या प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिकेकडे ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. पण आयुक्त डॉ. पंकज जावळे (वय 47, मूळ राहणार माजलगाव, बीड) व लिपिक श्रीधर देशपांडे यांनी बिल्डरकडे 9 लाख 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदाराने लाच न देता जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. देशपांडे यांनी मनपा आयुक्त जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत गेल्या आठवड्यात निष्पण झाले. आपल्याविरुद्ध तक्रार झाली असल्याची कुणकुण लागल्यानंतर दोघांनी गुरुवारी लाच स्वीकारली नाही. तक्रारदार आणि एसीबीचे पथक हे पैसे घेऊन सापळा रचण्यासाठी आले होते. परंतु पंकज जावळे आणि देशपांडे हे दोघेही महानगरपालिकेत आले नव्हते. दोघेही पसार झाले आहेत.
Ajit Pawar : अजित पवारांनी सांगितला सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा अन् …
कर्मचारी देशपांडे याला तक्रारदार यांच्याकडे लाच मागण्यासाठी जावळे हे प्रोत्साहन देत असल्याचे लाच पडताळणीमध्ये निष्पण झाले आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत असल्याचे जालना एसीबीच्या पथकाने आपल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.
जालन्याच्या पथकाची कारवाई
जालन्याचे एसीबीचे अधिकारी किरण बिडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर या पथकाने ही कारवाई केली आहे.