T20 World Cup 2026 साठी अफगाणिस्तान संघ जाहीर; राशिद खानकडे मोठी जबाबदारी

T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत होणार आहे. या विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून

  • Written By: Published:
T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत होणार आहे. या विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील संघाची घोषणा केली आहे. याच बरोबर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांची टी20 मालिकेसाठी देखील अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे.

रशीद खानकडे मोठी जबाबदारी

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी (AFGvsWI) आणि 2026 च्या विश्वचषकासाठी (T20 World Cup 2026) अफगाणिस्तानचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाची जबाबदारी रशीद खानकडे (Rashid Khan) देण्यात आली आहे तर इब्राहिम झद्रान उपकर्णधार असणार आहे. रहमानउल्लाह गुरबाज आणि सेदिकुल्लाह अटल सारख्या तरुण खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. मोहम्मद नबी आणि नवीन उल हक सारखे वरिष्ठ खेळाडू देखील अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

वेस्ट इंडिज मालिका आणि 2026 विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघ

राशिद खान (कर्णधार), इब्राहिम झदरन (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, शहिदुल्ला कमाल, अजमतुल्ला उमरझाई, गुलबद्दीन नायब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फक़ू अहमद, नवीन हक़ुअह़मद, नविन हक़ुअह़मद.

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानसाठी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन मिळणार

राखीव खेळाडू : एएम गझनफर, इजाज अहमदझाई आणि झिया उर रहमान शरीफी.

follow us