अमरावतीच्या अंबादेवी संस्थानसाठी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन मिळणार
Maharashtra Tourism Development Corporation : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना
Maharashtra Tourism Development Corporation : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर 8 आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
चिखलदरा (Chikhaldara) येथील सुमारे साडे सात एकर जमीन 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (Maharashtra Tourism Development Corporation) पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थान (Amravati Ambadevi Temple Trust) यांनी चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार… भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
या संस्थानाने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली आहे. त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर 8 आर जमीन शासन जमा करून घेऊन, ती श्री. अंबादेवी संस्थानास विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – 2 म्हणून मिळणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे.
वंचितने दिला काँग्रेसला धक्का, मुंबईत तब्बल 16 जागांवर उमेदवारच नाही; कारण काय?
