50 हजाराच्या लाचप्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडले, ACB ची मोठी कारवाई

50 हजाराच्या लाचप्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडले, ACB ची मोठी कारवाई

Pune Crime : पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) सेवेत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50,000 रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption Department) त्यांना सापळा रचून 15 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (A police officer in Pune was arrested by anti corruption in connection with a bribe of 50 thousand)

याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर धोंडिबा कुंभारे (43, पोलीस उपनिरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर) असे लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. शंकर कुंभारे हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात सेवेत होते. त्यांच्याकडे तक्रारदार यांच्याविरुध्दच्या तक्रारी अर्जाची चौकशी करण्यात आली होती. तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी पीएसआय शंकर कुंभारे यांनी तक्रारदाराकडे सुरूवातीला 50 हजार स्वरुपाच्या लाचेची मागणी केली आहे.

‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवरच स्वत:ला संपवलं; धनुष्यबाणाचं टोकं अन् समोर.., प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं स्टुडिओतील चित्र 

तक्रारदाराला लाचेची रक्कम द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, तक्रारीची पडताळणी केली असता पीएसआय शंकर कुंभारे यांनी तडजोडीअंती 30 हजार रुपयांची लाच घेण्याचे मान्य केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि कारवाईच्या दरम्यान, आरोपी पीएसआय कुंभारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केल्याचे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube