‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवरच स्वत:ला संपवलं; धनुष्यबाणाचं टोकं अन् समोर.., प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं स्टुडिओतील चित्र

‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवरच स्वत:ला संपवलं; धनुष्यबाणाचं टोकं अन् समोर.., प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं स्टुडिओतील चित्र

Nitin Desai Death : एनडी स्टुडिओमध्ये मराठी पाऊल पाऊल पडते पुढेच्या सेटवर धनुष्यबाणाच्या टोकासमोरच नितीन देसाईंनी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. त्यावेळी सेटवर काय परिस्थिती होती, याबाबत एका प्रत्यक्षदर्शींकडून माध्यमांना सांगण्यात आलं आहे.

नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !

सकाळी 9 वाजताच्या सुमारास आम्ही जेव्हा आतमध्ये प्रवेश केला तेव्हा सुरक्षा रक्षकांकडे नितीन देसाईंबद्दल विचारलं. त्यांनी ते ऑफिसमध्येच असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही त्यांना ऑफिसमध्ये पाहिलं पण ते ऑफिसमध्ये नव्हते, त्यानंतर आम्ही दादा तिकडे असतील असं आम्ही सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं.

PM मोदींच्या दहा मिनिटांच्या भेटीत अजितदादांनी मारली बाजी; पुण्याचे ‘चार’ मोठे प्रकल्प लागणार मार्गी

आम्ही त्यांना मराठी पाऊल पडते पुढेच्या सेटवर पाहताच क्षणी आमची भयानक अवस्था झाल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. रात्री उशिराने आल्यानंतर देसाई यांनी रश्शीचं धनुष्यबाण बनवलं होतं, त्याचं टोक समोर होतं आणि धनुष्यबाणाच्या टोकासमोरच त्यांनी गळफास लावून घेतला होता. दादांनी एका प्रतिनिधीला सांगितलं होतं की, तू उद्या सकाळी ये आणि ही रेकॉर्डर असेल त्यामध्ये जे काही असेल ते तू चेक कर, असं दादांनी गावातील एका प्रतिनिधीला सांगितलं असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या हालचालींना वेग, अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्षपदासाठी 27 अर्ज

त्यानंतर रेकॉर्डचा शोध आम्ही घेतला अन् रेकॉर्डींमधल्या काही गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही रेकॉर्डर पोलिसांकडे सोपवला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आम्ही दादांना 9 वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले होते. त्यानंतर तपास सुरु झाला असल्याचंही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, नितीन देसाई यांच्या निधनाच्या बातमीनंतर पोलिसांच्या तपासात रेकॉर्डिंगमध्ये काही लोकांची नावे उघड झाल्याचं समोर आलं आहे. नितीन देसाई यांच्यावर कर्जाचा डोंगरच उभा असल्याने त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समोर येऊ शकलेलं नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube