एके काळचे जिवलग मित्र आता कट्टर शत्रू, अमेरिका इराणच्या दुश्मनीचा इतिहास काय?

Iran Israel Conflict ज्या अमेरिकेने इराण विरूद्ध युद्ध पुकारलं. तेच एके काळी एकमेकांचे चांगले मित्र होते. काय आहे अमेरिका इराणच्या दुश्मनीचा इतिहास?

Iran Israel Conflict

Iran Israel Conflict Once best friends, now arch enemies, what is the history of the US-Iranian enmity : सध्या जगभरातील माध्यमांमध्ये एकच विषय आहे तो म्हणजे मिडल ईस्टमध्ये उसळलेला आगडोंब. इराण विरूद्ध उतरलेल्या इस्त्रायल अमेरिकेने थेट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना मारलंय त्यानंतर युद्धाची तीव्रता आणखी वाढलीय आणि इराणसह मिडल ईस्टमध्ये घडामोडी या सेकंड आणि मायक्रोसेकंडला बदलत आहेत. याचे दूरगामी परिणाम इराण मिडल ईस्टसह भारतावर देखील महागाई, आर्थिक फटका आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या रूपाने होणार आहे हे सगळं आहेच पण आज आपण जाणून घेणार आहोत ज्या अमेरिकेने आज इराण विरूद्ध युद्ध पुकारलं आहे. तेच इराण आणि अमेरिका एके काही एकमेकांचे चांगले मित्र होते. आता ते एवढे कट्टर शत्रू का झाले? काय आहे अमेरिका इराणच्या दुश्मनीचा इतिहास?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अजब कारभार, धुलिवंदनला मुलींच्या वसतिगृहाबाहेर नो ऐन्ट्री

जगामध्ये जेव्हा दोन कट्टर शत्रूंची चर्चा होते तेव्हा इराण-इजराइल आणि इराण-अमेरिका यांचं नाव पहिलं होतं. मात्र ही दुश्मनी फार जुनी नाही. जेव्हा अमेरिका आणि इजराइल हे मित्र राष्ट्र होते. सध्या सुरू असलेल्या युद्धा दरम्यान तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल 1948 मध्ये जेव्हा पश्चिम आशियातील मुस्लिम राष्ट्रांनी नव्याने निर्माण होत असलेल्या इजराइल मान्यता देण्यास विरोध केला होता. त्याच वेळेस शिया बहुल इराणने इजराइलला पाठिंबा दिला होता. तसेच जेव्हा इराणवर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. त्यावेळी अमेरिका इराणची मैत्री होती.

रणबीर कपूरचा लूक चर्चेत ‘रामायण’ मधील लूक, सोशल मीडियावर उफाळला वाद

ज्या इंग्रजांनी भातावर राज्य केलं त्याच इंग्रजांनी आणि रशियाने इराणला तेल साठ्यांसाठी आपआपल्या पद्धतीने वाटून घेतलं होतं. त्यासाठी त्यांनी जेव्हा इराणची जणता बंड करेल हे दिसु लागताच त्यांनी 1941 ला त्यांचं प्याद असणारा शासक शाह मोहम्मद रजा खान पहलवी तिथे बसवला. या काळात इराण मध्ये ब्रिटिशांचं बाहुलं असणाऱ्या पहलवीने इराणमध्ये महागाई, मोजक्याचं वर्गाला स्वातंत्र माध्यमांवर बंधन आणली होती.याच काळात अमेरिकेची इराणमध्ये एन्ट्री झाली. अमेरिकेने इराणवर हल्ला केला नाही, सत्ता बदल केला नाही पण अमेरिकेला येथे कंट्रोल हवा होता.

आमदार संग्राम जगतापांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’; फडणवीसांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

अमेरिकेच्या एंट्रीचा निमित्त होतं दुसऱ्या महायुद्धासाठ साठी ब्रिटन आणि रशिया यांना लागणाऱ्या शस्त्र आणि अन्नपुरवठासाठी याच काळात इराण मध्ये अमेरिकेचे प्रतिमा हे निष्पक्ष ज्यांना तेल नको आहे त्याचबरोबर ब्रिटन शोषण करतो मात्र अमेरिका तशी नाही. मात्र जेव्हा 1951 मध्ये मोहम्मद मोसादेग इराणचे पंतप्रधान झाले त्यांनी इराणला कोणताही फायदा न होता पाश्चिमात्य राष्ट्र आणि अमेरिका घेऊन जात असलेल्या तेलाला विरोध केला इराणच्या तेल उद्योगाचा राष्ट्रीयकरण केलं. याचा फटका बसल्याने 1953 मध्ये अमेरिका आणि ब्रिटन यांनी मिळून इराणमध्ये पुन्हा एकदा तक्तापालट केला. कारण मित्रत्वाचा चेहरा घेऊन आलेल्या अमेरिकेला देखील इराणच्या तेलामध्येच इंटरेस्ट होता. त्यातून ब्रिटन अमेरिका एकत्र आले होते.

अमेरिका इराण युद्ध पेटलेलं, मराठवाड्यातील अनेक नागरिक आखाती देशात अडकले

तर याच वेळी जेव्हा मोसादेग जाऊन इराणचे नेतृत्व पुन्हा एकदा शाह यांच्याकडे आले होते तेव्हा अमेरिकेच्या माध्यमातून इस्रायलची इराणमध्ये एन्ट्री झाली त्यांनी तहरांमध्ये एक दूतावास देखील सुरू केलं इराणी मध्ये तेल व्यापार सुरू झाला इराण इजराइल हे यांच्यात लष्करी करार देखील झाले.

भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

मात्र 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली ज्यामध्ये लोकांनी शाह यांच्याकडून सुरू असलेली जुलमी राजवट याविरुद्ध रस्त्यावर उतरायला सुरुवात केली जो इजराइल पॅलेस्टाईन च्या हक्कांविरुद्ध आहे. त्यांना शहा यांनी गालिचे अंथरले होते याचा राग इराणी लोकांना होता परिणामी परिस्थिती एवढी बिघडली की शाह यांना देश सोडून पळून जावं लागलं.

खामेनींच्या हत्येचे समर्थन करतात का?  परराष्ट्र धोरणावर राहुल गांधींचा PM मोदींना थेट सवाल

दुसरीकडे सत्तेवर नवे पंतप्रधान आले त्यांनी देशातून काढून देण्यात आलेल्या धार्मिक नेते अयातुल्ला रूहोल्लाह खामेनेई यांनी परतण्याची परवानगी दिली. त्यांनी देशात येताच इराणला इस्लामिक रिपब्लिक घोषित केलं आणि रुहोल्लाह खोमेनी यांना देशाचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्यात आले. सरकार नाही तर अंतिम सत्ता त्यांचीच असेल इस्लामिक क्रांतीने इराण आणि इस्रायलचा प्रभाव पूर्णपणे संपुष्टात आणला. इराण आणि अमेरिकेतील राजनैतिक संबंधही संपुष्टात आले. इस्लामिक क्रांतीनंतर, शाहच्या कारकिर्दीत एकेकाळी मित्र असलेले अमेरिका आणि इराण कट्टर शत्रू बनले. याच सुमारास, अमेरिकन दूतावासात ५२ अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवण्याची घटना घडली. ते ४४४ दिवस ओलीस राहिले. तर पॅलेस्टिनी प्रश्नाला इस्लामिक मुद्दा म्हणून मांडले. खोमेनींच्या राजवटीत इराणने पॅलेस्टिनी प्रश्नावर आक्रमक भूमिका स्वीकारली. या घटनांमुळे इराणचे इजरायल-अमेरिकेका या दोन्ही देशासोबतचे संबंध ताणले गेले.

इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींच्या हत्येचा मोदी सरकारने निषेध का केला नाही?, काय आहे कारण?

कालांतराने, इराणचे इस्रायल आणि अमेरिकेशी असलेले वैर वाढले यात भर घातली ती इराणचा अणुऊर्जा प्रकल्पाने. कारण एकीकडे यातून 1980 ते 90 इराण प्रणित इस्त्रायलला विरोध करणाऱ्या दहशदवादी संघटना निर्माण झाल्या. ज्यामध्ये लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, येमेनमध्ये हुथी आणि गाझामध्ये हमाससह इतर सशस्त्र शिया मिलिशिया इस्त्रायला विरोधात उभ्या राहिल्या. तर दुसरीकडे इराणने अणुऊर्जा प्रकल्प सुरू केल्याने या संघटना आणि इराण इस्त्रायलसह जगाला धोका निर्माण करेल या कारणाखाली इस्त्रायल अमेरिकेने इराणला शक्तीशाली बनू न देण्याचं मिशन हाती घेतलं.

राम चरणने पूर्ण केलं पेड्डीचं डबिंग; मेकर्सने शेअर केला BTS व्हिडिओ

इराणला अणुबॉम्ब विकसित करण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलने अनेक गुप्तचर कारवाया केल्या. या हल्ल्यांमध्ये अनेक उच्च-प्रोफाइल अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या वर्षभरात अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध थेट युद्ध करण्याची ही दुसरी वेळ आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करण्यात आली आहे. इराण देखील बदला म्हणून अरब देशांमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करत आहे. येणाऱ्या काळात एक मोठी ऐतिहासिक घटना घडू शकते, ज्यावर संपूर्ण जग लक्ष ठेवून आहे.

follow us