Iran War : आठवडाभर हल्ले सुरुच…ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका, 100 डॉलरच्या वर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हल्ल्याच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून 100 डॉलरच्या वर पोहोचले आहेत.
Iran War : इराण-इस्त्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील आठवडाभर इराणवर हल्ले सुरुच राहणार असल्याची घषणा केलीयं. ट्रम्प यांच्या या घोषणनेचा परिणाम तेलाच्या किमतीवर झालायं. अमेरिकन क्रूड तेल 2.24% ने वाढून प्रति बॅरल 102.36 डॉलरवर पोहोचले, तर ब्रेंट क्रूड 3.24% ने वाढून 104.44 डॉलरवर पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी १ एप्रिल २०२६ रोजी इराण युद्धाबाबत देशाला उद्देशून महत्त्वपूर्ण भाषण केले. “ऑपरेशन एपिक फ्युरी” अंतर्गत अमेरिकेची उद्दिष्टे पूर्ण होत असल्याचे सांगत त्यांनी युद्धाच्या समाप्तीचे संकेत दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प बोलताना म्हणाले, अमेरिकी सैन्य लवकरच अमेरिकेची सर्व लष्करी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर हल्ला करणार आहोत… त्यांना थेट पाषाणयुगात परत नेणार आहोत. इराणमधील लष्कराची उद्दिष्ट्ये “बहुतांशी पूर्ण झाली असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. तसेच अमेरिकी सैन्य पुढील दोन ते तीन आठवडे हल्ले सुरूच ठेवणार असून सर्व उद्दिष्टे लवकरच पूर्ण होणार असल्याच ट्रम्प यांनी म्हटलंय.
लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी स्वीकारला कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार
इराण करार रद्द करण्याच्या निर्णयाचे ट्रम्प यांनी समर्थन केले असून त्यांनी ओबामांच्या कराराला ‘आपत्ती’ असं म्हटलंय. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात वाटाघाटी झालेला इराण अणुकरार रद्द केला आहे. तेहरानच्या अणु महत्वाकांक्षांना आळा घालण्यात अयशस्वी ठरलेला हा करार एक आपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी दावा केला की, 1.7 अब्ज डॉलर्स रोख रक्कम मिळाल्यानंतरही या करारामुळे इराणला अण्वस्त्र निर्मिती सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली. तेहरानने अमेरिकेची “थट्टा” केली आणि आपला कार्यक्रम पुढे रेटला असल्याचा आरोपही त्यांनी केलायं. तसेच जर हा करार कायम राहिला असता, तर इराणने अण्वस्त्रांचा ‘प्रचंड शस्त्रसाठा’ तयार केला असल्याचं ते म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
-. युद्धाचा शेवट जवळ: अमेरिकेची मुख्य लष्करी उद्दिष्टे पूर्ण होत आली असून, पुढील २ ते ३ आठवड्यांत इराणमधील लष्करी कारवाई संपुष्टात येऊ शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिले.
-इराणी नौदलाचा नायनाट: अमेरिकेने इराणचे नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून त्यांचे हवाई दलही आता कमकुवत झाले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.
– क्षेपणास्त्र यंत्रणेवर प्रहार: इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ती तयार करण्याची क्षमता अमेरिकेने मोठ्या प्रमाणात नष्ट केली आहे, ज्यामुळे इराणची हल्ला करण्याची शक्ती संपली आहे.
-अण्वस्त्र कार्यक्रमावर नियंत्रण: इराण कधीही अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री अमेरिकेने केली आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर यशस्वी हल्ले केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
-मित्रराष्ट्रांना स्पष्ट इशारा: अमेरिकेने मित्रराष्ट्रांना (विशेषतः युरोपियन देशांना) स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः लढायला शिकण्याचे आवाहन केले. “अमेरिका आता मदतीसाठी तिथे नसेल,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
-इंधनाचे दर कमी होणार: युद्धाचा परिणाम म्हणून वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर अमेरिका इराणमधून बाहेर पडताच वेगाने कमी होतील, असे आश्वासन ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला दिले.
-होरमुझच्या सामुद्रधुनीची सुरक्षा: इंधनाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘होरमुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यावरून तेल आयात करणाऱ्या देशांनीच घ्यावी, असे त्यांनी सुचवले.
-दहशतवादी गटांची कोंडी: इराणकडून इतर देशांमधील दहशतवादी गटांना (Proxies) मिळणारी आर्थिक आणि लष्करी मदत अमेरिकेने पूर्णपणे तोडली आहे.
-चीन आणि पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव: युद्ध संपवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने दिलेल्या शांतता प्रस्तावावरही अमेरिका विचार करत असल्याचे समोर आले आहे.
-‘अमेरिका फर्स्ट’ धोरण: हे युद्ध लांबवण्याचा अमेरिकेचा कोणताही विचार नाही. अमेरिकेच्या हिताची कामे पूर्ण झाली असून लवकरच सैन्य मागे घेण्यावर भर दिला जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.