साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या हालचालींना वेग, अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्षपदासाठी 27 अर्ज
Shirdi Sai Baba : राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Baba) विश्वस्त मंडळासाठी (Board of Trustees) हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 सदस्यीय विश्वस्त मंडळासाठी राज्यभरातून 539 जणांनी अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज आता विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्षपदासाठी 27 जणांनी अर्ज केले असून 50 टक्के जागा स्थानिकांना द्याव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (Saibaba Sansthan Board of Trustees 33 applications for the post of President and 27 for the post of Vice President)
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळात आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण उत्सुक असतात. आजवर अनेक मातब्बर व्यक्तींना या पदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत विश्वस्त होण्याचा मान मिळवला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेनंतर अनेकांनी न्यायालयात धाव घेऊन सदर निवड प्रक्रिया नियमांचे पालन न केल्याने रद्द केली. त्यामुळे गेल्या सध्या साईबाबा संस्थानवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेली त्रिसदस्यीय समिती कामकाज पाहात असून राज्यात नवीन सरकार आल्यावर पुन्हा एकदा विश्वस्त मंडळ पदाच्या हालचालींना सुरूवात झाली आहे.
PM मोदींच्या दहा मिनिटांच्या भेटीत अजितदादांनी मारली बाजी; पुण्याचे ‘चार’ मोठे प्रकल्प लागणार मार्गी
दरम्यान, 17 सदस्यीय साईबाबा विश्वस्त मंडळ असून राज्यभरातून 17 जागांसाठी 539 अर्ज दाखल झाले आहेत. अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्षपदासाठी 27 अर्ज आले आहेत. महिला कोट्यासाठी 33 अर्ज प्राप्त झाले असून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 33 अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेषीकृत ज्ञान धारणा (विधी) साठी 53 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्याव्यतिरिक्त विविध कोट्यातून अनेक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हे अर्ज आता राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.
विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीत स्थानिकांना 50 टक्के जागा द्याव्यात, अशी मागणी आता ग्रामस्थांनी पुढे आणली. साईभक्तांच्या समस्या आणि स्थानिक समस्यांची स्थानिकांना जाणीव असल्याने शिर्डीच्या विकासाला अधिक प्राधान्य देता येईल, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. आमच्या लोकप्रतिनिधींनी त्यासाठी नेतृत्व करायला हवं, अशी मागणी 15 वर्ष विश्वस्त पदाचा अनुभव असलेले एकनाथ गोंदकर यांनी केली. जेजुरीच्या खंडोबा देवस्थानात 50 टक्के स्थानिकांना जागा न मिळाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. तसेच शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळावर नियुक्तीच्या वेळी सरकारने स्थानिक लोकांना डावलल्यास वाद होऊ शकतो.
एखाद्या राजकीय व्यक्तीला विश्वस्तपद देऊन त्याचे राजकीय पुनर्वसन केले जाते, हे अनेकदा दिसून आलं. त्यामुळं आता विश्वस्त म्हणून कोणाची वर्णी लागेल, हेच पाहणं महत्वाचं आहे.