PM मोदींच्या दहा मिनिटांच्या भेटीत अजितदादांनी मारली बाजी; पुण्याचे ‘चार’ मोठे प्रकल्प लागणार मार्गी

PM मोदींच्या दहा मिनिटांच्या भेटीत अजितदादांनी मारली बाजी; पुण्याचे ‘चार’ मोठे प्रकल्प लागणार मार्गी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा मंगळवारी (1 ऑगस्ट) बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित पुणे दौरा पार पडला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौऱ्यात पुण्याच्या रखडलेल्या प्रकल्पांबाबतही चर्चा केली आहे, त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पांना निश्चित गती येईल असा मोठा आशावाद उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. (Deputy Chief Minister Ajit Pawar’s discussion with Prime Minister Narendra Modi regarding pending projects in Pune)

अजित पवार म्हणाले, शहर आणि परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या पुरंदर विमानतळ, पुणे-नाशिक ग्रीन कॅरिडोअर, पुणे रिंगरोड या प्रकल्पांना येणाऱ्या काळात नक्की गती येईल. यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार आहे, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. पंतप्रधानांशीही बोलणे झाले. दिल्लीत आल्यानंतर बोलू, असे त्यांनी सांगितले आहे.

भिडेंवरून फडणवीस-पृथ्वीराज चव्हाण भिडले ! गुरुजी, बाबा नावावरून एकमेंकाना थेट पुरावेच मागितले

पुरंदर विमानतळाच्या जागेवरून वाद आहेत. काही जणांना अलीकडे विमानतळ व्हावे असे वाटते, तर काही जणांना पलीकडे हवे आहे. पण कोणाला काय वाटते यापेक्षा नागरी विमान वाहतूक विभागाने काही परवानग्या दिल्या आहेत. आगामी काळाचा विचार करता पुणे शहर, जिल्हा आणि आजूबाजूच्या भागाला आंतरराष्ट्रीय विमानतळची आवश्यकता आहे. त्यामुळे विमानतळाचे काम लवकर सुरू होणे गरजेचे आहे. एक वर्ष मी विरोधी पक्षात होतो. मंगळवारी दुपारीच मला या गोष्टींवर बोलायचे होते. परंतु पंतप्रधानांच्या कार्यक्रमात वेळ कमी होता, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Ajit Pawar : पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजितदादा लागले कामाला; ‘पुण्यासाठी’ घेतला मोठा निर्णय

अवघ्या 10 मिनिटात अजितदादांची बाजी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आल्यानंतर त्यांचा दौरा अत्यंत व्यस्त होता. एकापाठोपाठ एक त्यांचे तीन कार्यक्रम होते. मात्र यातूनही वेळ काढत अजित पवारांनी पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत 10 मिनिटे वेळ काढून चर्चा केली. मात्र वेळ कमी असल्याने दिल्लीत आल्यावर बोलू, असं म्हणतं पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना पुण्यातील प्रकल्पासाठी दिल्लीला येण्याचे आमंत्रणही दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube