जालना हादरले! 10 लाखांची लाच घेताना मनपा आयुक्त संतोष खांडेकर एसीबीच्या सापळ्यात अडकले
जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त संतोष खांडेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सापळ्यात अडकले.

Jalna Municipal Commissioner Caught By ACB 10 Lakh Bribe : जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त संतोष खांडेकर हे गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सापळ्यात अडकले. त्यांनी एका बांधकाम कंत्राटदाराकडून कामाचे देयक काढण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी करण्यात आली.
एसीबीच्या सापळ्यात अडकले
छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत (Jalna) प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. त्यांनी सांगितले की, सदर प्रकरणाची चौकशी आणि पुढील कारवाई सुरू (Crime News) आहे. तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराने मनपाकडून आपल्या केलेल्या कामाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, आयुक्त खांडेकर (Santosh Khandekar) यांनी त्यासाठी मोठी रक्कम लाच म्हणून मागितल्याची तक्रार ACB कडे दाखल करण्यात आली.
10 लाखांची लाच
तक्रार पडताळणी दरम्यान खांडेकर यांनी 10 लाख रुपयांवर तडजोड (Santosh Khandekar Caught By ACB 10 Lakh Bribe) करत देयक काढून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि गुरुवारी सायंकाळी खांडेकर यांनी तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
कागदपत्रे व पुरावे जप्त
या प्रकरणामुळे संपूर्ण जालन्यात खळबळ उडाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त असलेल्या अधिकाऱ्यांचा लाच प्रकरणात अडकल्याने प्रशासनाची प्रतिमा डागाळली आहे. सध्या ACB पथकाने निवासस्थान आणि संबंधित कार्यालयातील कागदपत्रे व पुरावे जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर मनपा कर्मचाऱ्यांमध्येही मोठी चर्चा सुरू आहे. पारदर्शक प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाचलुचपत विभागाने हे प्रकरण राज्य शासनाला अहवालासह कळवले. खांडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.