मोठी बातमी : अहमदनगर महानगरपालिकेत बड्या अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई, दालनही सील
Anti Corruption Bureau action on Pankaj Jawale अहमदनगरः अहमदनगर महानगरपालिकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. पालिकेतील एक बडा अधिकारी व कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. परंतु बडा अधिकारी हा फरार झाला आहे. त्याचा एसीबीचे पथक शोध घेत आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठी आठ लाख रुपयांचे लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. एका लिपिकाकडे एसीबीच्या अधिकारी चौकशी करत आहेत.या कारवाईने नगरमध्ये खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेची मुदत संपल्याने महानगरपालिकेवर प्रशासकराज असून, महापालिकेच्या आयुक्तांवर ही जबाबदारी आहे.
…तर भारतीय संघ करणार थेट फायनलमध्ये एंट्री, ICC कडून मोठी घोषणा
दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांचे कार्यालय हे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सील केले आहे. हे कार्यालय का सील केले, याबाबत मात्र अधिकारी हे माहिती देत नाहीत. या प्रकरणी अजूनपर्यंत गुन्हाही दाखल झालेला नाही. एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईबाबत कमालीचे गुप्तता पाळली गेली आहे. नगरच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली नाहीत. त्यासाठी बाहेरून काही पथके आले आहेत. ते सकाळपासून महानगरपालिकेत ठाण मांडून आहेत. तसेच चौकशी करत आहे.
बीडमध्ये खळबळ! शिवसेना जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल; म्हणाले, पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना…