Ajit Pawar : अजित पवारांनी सांगितला सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा अन् …

Ajit Pawar  : अजित पवारांनी सांगितला सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा अन् …

Ajit Pawar : आजपासून राज्याचा पावसाळी अधिवेशन सुरु झाला आहे. आज विधानपरिषद (Legislative Assembly) निवृत्त सदस्यांच्या निरोप कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलताना विधानपरिषदेतील सदस्य निवडनू आल्यानंतर किती काळ सभागृहात उपस्थित राहातात असा सवाल उपस्थित करत निवडणून दिलेल्या सदस्यांनी सभागृहात येऊन काम केलं पाहिजे तसेच लोकांचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजे असं अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले की, मी विधानपरिषदेमध्ये आतापर्यंत अनेक भाषणे ऐकली आहे.परंतु सुरुवातीच्या काळात विधान परिषदेमध्ये एक वेगळ्या पद्धतीने भाषणे होत होती. मात्र आता तसं होत नाही. आता विधानपरिषदेमध्ये तरुण लोकही येत आहे मात्र 6 वर्षात ते किती दिवस सभागृहात उपस्थित राहतात याचा देखील आत्मचिंतन झाला पाहिजे. ज्या भागातून आपल्याला या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली त्या भागातील लोकांचे प्रश्न या सभागृहात मांडले पाहिजे. त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे असं देखील अजित पवार बोलताना म्हणाले.  तर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या बाबत देखील त्यांनी एक किस्सा शेअर केला.

अजित पवार म्हणाले, सुरेश राव यांना मी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली होती. ते आधी भाजपनंतर राष्ट्रवादी आणि आता पुन्हा भाजपमध्ये आले आहे. त्यांच्या एक वर्तुळ पूर्ण झाला आहे. मी तुमच्या पेक्षा जास्त सुरेश धस यांना ओळखतो असेही ते म्हणाले.

तर आमदार सुरेश धस यांचा किस्सा शेअर करताना अजित पवार म्हणाले, माझ्याकडे एक दिवस सुरेश धस त्यांच्या आईसोबत आले होते आणि माझ्याकडे त्यांनी एक परवानगी मागितली. तेव्हा मी त्यांना विचारलो कसली परवानगी? तर त्यावेळी सुरेश धस म्हणाले मला दुसरं लग्न करायचे आहे यासाठी मला परवानगी द्या. त्याची ही गोष्ट ऐकून मी कपाळाला हात लावला असं अजित पवार म्हणाले. तसेच मी त्यांना मंत्रिपदाची देखील जबाबदारी दिली होती तेव्हा त्यांनी खूप चांगलं काम केले असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

NEET UG Paper Leak Case मध्ये CBI ची मोठी कारवाई, 2 जणांना अटक

21 जून 2024 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेतील पाच सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यांचा निरोप समारंभ 27 जून रोजी विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सुरेश धस, प्रवीण पोटे – पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया हे विधान परिषद सदस्य 21 जून रोजी निवृत्त झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज