मोठी बातमी! मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर दिवसाढवळ्या गोळीबार, चंद्रपुरात एकच खळबळ

मोठी बातमी! मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर दिवसाढवळ्या गोळीबार, चंद्रपुरात एकच खळबळ

Chandrapur : चंद्रपूर (Chandrapur) शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघवंशी कॉम्प्लेक्स येथे भरदुपारी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार (Aman Andewar) यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला. या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात अमन अन्देवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पोलिसांनी उपचारासाठी नागपूरला पाठवले आहेत.

Sarfira: प्रत्येकाच्या लग्नात वाजणार, सगळे नाचणार, खिलाडी कुमारचं ‘चावट’ गाणं प्रदर्शित 

सविस्तर वृत्त असे की, आज (दि. ४ जुलै) रोजी दुपारी दीडच्या सुमारास मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार कार्यालयात येण्यासाठी रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या लिफ्टजवळ आले. तेथे त्यांनी लिफ्टचे बटण दाबले आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. अज्ञात व्यक्तीने अन्देवार यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी अन्देवार यांना चाटून गेली तर दुसरी गोळी त्यांच्या पाठीला लागली. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांची तारांबळ झाली. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

“टीम इंडियाला मुंबईच्या ‘बेस्ट’मधूनच फिरवा”; गुजरातच्या बसला रोहित पवारांचा रेड सिग्नल 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रभावती एकुरके घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे महेश कोंडावार हेही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी जखमी अन्देवार यांना कुबेल रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फुटेजमध्ये अज्ञात शूटरने तोंडाला पांढरा रुमाल बांधल्याचं दिसून आलं.

बहुरिया समर्थकांकडून गोळीबाराचा संशय
8 ऑगस्ट 2020 रोजी, बल्लारपूर शहरात सुरज बहुरिया यांची अवैध दारू व्यवसायातिल वर्चस्वातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या प्रकरणी पोलिसांनी अमन अन्देवार आणि आकाश अन्देवार यांना अटक केली होती. 2021 मध्ये आकाश अन्देवार यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर 12 जुलै 2021 रोजी रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आकाश अन्देवार यांच्यावर बहुरिया समर्थकांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी आकाशला तीन गोळ्या लागल्या मात्र सुदैवाने ते बचावले. मात्र, अन्देवार बंधूंनी बहुरियाची हत्या केली असून, त्यांना मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पवित्रा बहुरिया यांच्या समर्थकांनी घेतला होता. त्यामुळं पोलिसांचा बहुरिया समर्थकांवर गोळीबाराचा संशय आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज