राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 35 जागांवरील निवडणूक रद्द; नेमकं कारण काय?

Maharashtra Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार

  • Written By: Published:
Maharashtra Local Body Election

Maharashtra Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत 35 जागांवर मतदान तूर्तास रद्द केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्ह्यांतील 35 जागांवरील मतदान पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्याने आता 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान रद्द करण्यात आले आहे.

नेमकं कारण काय?

राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, अर्ज छाननीदरम्यान निवडणूक निर्णय (Maharashtra Local Body Election) अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांविरोधात संबंधित 35 जागांवरील उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या मात्र या याचिकांवर आतापर्यंत निकाल लागला नसल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली आहे. न्यायालयाने कोणताही आदेश न दिल्याने उमेदवारांना चिन्हांचं वाटप शक्य नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी मतदान अनिश्चित काळासाठी पूढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

या जिल्ह्यातील 35 जागांवर निवडणूक स्थगित

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, गोंदीया, जालना, लातूर, पुणे, परभणी, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील जागांवरील मतदान अनिश्चित काळासाठी पूढे ढकलण्यात आले आहे.

तर दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Maharashtra Election) सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने या निवडणुकीसाठी ओबीसींना सरसकट 27 टक्के आरक्षण दिल्याने अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्के पेक्षा जास्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

आज दुपारी या प्रकरणात सुनावणी सुरु होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की रद्द होणार याबाबत सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय देऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

follow us