तु निघून जा किंवा जीव दे… पतीच्या प्रेम संबंधातून पत्नीची आत्महत्या, संभाजीनगरमधील घटना

ते गाडीचे चालक होते. या यात्रेदरम्यान त्यांची ओळख सरिता वाणी यांच्याशी झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 26T170420.989

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला आहे. (Crime) वडिलांच्या ओळखीतील महिलेच्या त्रासाला कंटाळून आईने आत्महत्या केल्याचा आरोप मुलाने केला आहे. या घटनेत एका महिलेच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार रूपेश गजानन सपकाळ वय 25 यांनी दिली आहे

तक्रारीनुसार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजता रूपेश सपकाळ यांची आई अनिता सपकाळ यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रूपेशचे वडील चार वर्षांपूर्वी चारधाम यात्रेसाठी गाडी चालवण्याचं काम करत होते. या यात्रेदरम्यान त्यांची ओळख सरिता वाणी यांच्याशी झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

पुणे ते शिरूर अन् अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्ता तातडीने दुरुस्ती करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

ही बाब घरी समजल्यावर अनिता सपकाळ यांनी पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही सरला वाणी आणि रूपेशचे वडील यांच्यात मोबाईलवरून सतत तासनतास बोलणं सुरूच होतं. एक दिवस सरला वाणी या सपकाळ यांच्या घरी आल्या. त्यावेळी अनिता सपकाळ यांनी त्यांना या संबंधांना पूर्णविराम देण्यास सांगितलं. पण, या घटनेनंतर सरला वाणी यांचे घरामध्ये येणे-जाणे वाढले. यामुळे अनिता सपकाळ मानसिक तणावाखाली गेल्या होत्या.

त्यांनी अनेकदा या संबंधांचा आणि सरला वाणी यांच्या घरात येण्याचा विरोध केला असता, सरला वाणी यांनी सपकाळ यांच्या आईला “आता तो माझा नवरा आहे, तू इथून निघून जा नाही तर तुझ्या जीवाचे बरेवाईट कर”, अशी धमकी दिल्याचा आरोप रूपेश यांनी केला आहे. हा सतत चालणारा त्रास सहन न झाल्यामुळे रूपेश यांच्या आईने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीवरून सरला वाणी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करत आहेत.

follow us