मी 20-20 खेळू शकतो, गोऱ्हेंनी फार न्याय दिला नाही; निलंबन मागे घेताच ठाकरेंच्या वाघाची ‘डरकाळी’

  • Written By: Published:
मी 20-20 खेळू शकतो, गोऱ्हेंनी फार न्याय दिला नाही; निलंबन मागे घेताच ठाकरेंच्या वाघाची ‘डरकाळी’

मुंबई : विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी निलंबन केलं होतं. मात्र, दानवेंकडून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता निलंबनाचा कालावाधी पाच दिवसांवरून तीन दिवसांवर आणण्यात आला असून, उद्यापासून दानवे सभागृहाच्या कामकाजात हजेरी लावू शकणार असून, निलंबनाची कारवाई मागे घेताच ठाकरेंचा वाघ असणाऱ्या अंबादास दानवेंनी डरकाळी फोडत राज्य सरकारला इशारा दिला आहे. (Ambadas Danve First Reaction After Suspension Withdrawn )

धनंजय मुंडेंच्या हातात काहीच नाही; परळीत दहशद वाल्मिक कराडांची, रोहित पवारांचा घणाघात

मी टेस्टप्रमाणे 20-20 ही खेळू शकतो

निलंबनाची कारवाई मागे घेतल्यानंतर दानवेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निलंबनाचा कालावधी कमी करण्यासाठी दानवेंनी उपसभापती गोऱ्हे यांचे आभर मानले. पण त्यांना मला फार काही न्याय दिला असा त्याचा अर्थ नाही. कारण कारवाईतील तीन दिवस संपले आहे. उद्या एक दिवस कामकाज असून, रविवारी कामकाज बंद आहे. त्यामुळे 5 दिवसांपैकी 1 दिवसचं मला कामकाज करण्यासाठी मिळणार आहे असा त्याचा अर्थ असून, ज्या पद्धतीने मी टेस्ट मॅच खेळू शकतो त्याप्रमाणे मी 20 -20 पण खेळू शकेल आणि नक्की खेळेल असा विश्वास दानवेंनी बोलून दाखवला.

मोठी बातमी : वसंत तात्यांचा ‘वंचित’ला गुड बाय; ठाकरेंचं शिवबंधन बांधण्याचा मुहुर्त ठरला!

सभागृहात नेमंक काय घडलं होतं?

लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदू समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केल्याने भाजपच्या आमदारांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही आक्रमक पवित्रा घेण्यात आला. यामध्ये अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता. या वादात अंबादास दानवे यांनी मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद असल्याचं म्हणत दानवेंनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर दानवे यांच्यावर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याबाबत संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला होता. यानंतर सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज