विश्वजित कदमांच्या वक्तव्याला कॉंग्रेसमध्ये महत्व नाही, येणाऱ्या काळात…; अंबादास दानवेंचा टोला
Ambadas Danve on Vishwajit Kadam : कॉंग्रेस आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांनी काल (दि. 23 जून) कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मोठं विधान केलं होतं. राज्यात पुढचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच (Congress) असेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाष्य केलं. येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते, असं दानवे म्हणाले.
Salim Khan: …म्हणून सलमान खान अजूनही आहे बॅचलर? वडील सलीम खान यांनी सांगितले कारण
अंबादास दानवेंनी आज एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना विश्वजित कदमांच्या वक्तव्याविषयी विचारलं असता दानवे म्हणाले की, अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तसंच जागावाटपही झालेलं नाही. खंरतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे. मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते, असं दानवे म्हणाले.
Parliament special session : कुणी नतमस्तक तर कुणाचं ग्रुप फोटोसेशन; पाहा खासदारांचे खास फोटो
पटोले-कदम जे म्हणतात त्याला महत्व नाही…
लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. कॉंग्रेस आणि शरद पवार गटाकडून जागावाटपासंदर्भात दावे केले जात आहेत. त्याविषयी विचारलं असता दानवे म्हणाले, गेल्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळाली होती. तो देखील शिवसेनेचा माजी आमदार होता. मुळात काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व परिपक्व आहे. नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय म्हणतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्वं आहे, असं वाटतं नाही, असा टोला त्यांनी लगावला.
विश्वजित कदम काय म्हणाले ?
सांगली जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांना फसवण्यात आलं. मिरजेतील जनतेची फसवणूक झाली. हे माणसं विसरलेले नाहीत. त्यामुळे आपसातील मतभेद विसरून पूर्ण ताकदीने एकत्र काम करावे लागेल. येणाऱ्या निवडणुकीतून सांगलीतून चार ते पाच आमदार कॉग्रेसचे असतील. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल, असं कदम म्हणाले होते.