Salim Khan: …म्हणून सलमान खान अजूनही आहे बॅचलर? वडील सलीम खान यांनी सांगितले कारण

Salim Khan: …म्हणून सलमान खान अजूनही आहे बॅचलर? वडील सलीम खान यांनी सांगितले कारण

Salman Khan Unmarried Reason: कलाविश्वात सलमान खानचं (Salman Khan) करिअर मोठं आहे. सलमानने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यात कॉमेडी, अॅक्शन, ट्रॅजेडी, इमोशनल अशा सिनेमांचा समावेश होतो. (Social Media) काही सिनेमे चालले. तर काही सिनेमे पडले. पण तो कधी लग्न करणार आणि कोणासोबत हा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात नेहमीच फिरत असतो. अनेकवेळा चाहते सोशल मीडियावर भाईजानला थेट प्रश्नही विचारतात. पण सलमान खानने लग्न न करण्यामागचे खरे कारण काय आहे. याविषयी आता थेट वडील सलीम खान (Salim Khan) यांनी कारण स्पष्ट सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@___salmankhanfanclub)


सलीम खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलीम खान सलमान खानने अद्याप लग्न न करण्याचे कारण सांगितले आहे. सलीम खान म्हणत आहेत- ‘तो सहज कोणत्याही नात्यात जातो. मात्र प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. खर तर तो स्वभावाने खूप मृदू आहे आणि माणूस आहे. त्यामुळे तो कोणाकडेही सहज आकर्षित होणे स्वाभाविक आहे. ती मुलगी आपल्या आईप्रमाणे कुटुंब चालवू शकेल का?असा प्रश्न त्याला नेहमी पडतो. तो नेहमी मुलींमधील गुण शोधतो जे त्याच्या आईमध्ये आहेत.

कुटुंबावर लक्ष केंद्रित

सलीम खान पुढे म्हणाले की ‘सलमानला नेहमी अशा स्त्रीशी लग्न करायचे आहे जी पूर्णपणे आपल्या मुलांवर आणि पतीवर लक्ष केंद्रित करेल. मुलांसाठी स्वंयपाक करणे, त्यांना तयार करणे आदी गोष्टी पाहणे आजच्या काळात महत्वाचे आहे. या कारणास्तव ते लग्नासाठी कोणत्याही महिलेकडे लक्ष देऊ शकत नाहीत.

Salman Khan: भाईजान गॅलेक्सी सोडणार?; तर ‘या’ ठिकाणी होणार शिफ्ट

अनेकांशी प्रेमसंबंध होते

सलमान खान वयाच्या 58 व्या वर्षी बॅचलर असला तरी त्याने अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या राय, सोमी अली, संगीत बिजलानी आणि कतरिना कैफ यांच्या नावाचा समावेश आहे. पण त्याचे नाते कोणाशीही पुढे जाऊ शकले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज