Firing Case: ‘मार देंगे तब पता चलेगा…’, गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया

Firing Case: ‘मार देंगे तब पता चलेगा…’, गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया

Salim Khan On House Firing Case: सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan ) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला सध्या गोपनीयता हवी आहे. (Salman Khan Firing Case) या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी दोघांना अटक करण्यात आली. सलमान खान सध्या त्याच्या घरी आहे. मात्र, सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या संपूर्ण प्रकरणावर चर्चा केली आहे. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबतही त्यांनी निवेदन दिले आहे.

इंडिया टुडेशी संवाद साधताना सलीम खान (Salim Khan) यांनी प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली. सलीम खान म्हणाले की, घाबरण्यासारखे काही नाही, प्रकरण आता पोलिसांकडे आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. सलमानच्या कामाशी संबंधित प्रश्नावर सलीम खान म्हणाले.

‘सलमान कोणतीही काळजी न करता आपले काम करू शकतो, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. कारण, पोलीस आपले काम करत आहेत. याबद्दल बोलण्यासारखं फारसं काही नाही. तो लॉरेन्स बिश्नोई फक्त म्हणत राहतो की आम्हाला मारल्यावरच कळेल. अशा अशिक्षित लोकांना काय म्हणावे?’

12th Fail In Chaina: चीनमध्ये 20 हजार स्क्रीनवर रिलीज होणार विक्रांत मॅसीचा ‘ट्वेल्थ फेल’

गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Chief Minister Eknath Shinde) सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. त्याने सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, ‘मी पोलिसांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. सरकार सलमानच्या पाठीशी आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर, 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने हा हल्ला केल्याचा दावा फेसबुक पोस्टद्वारे करण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज