Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणात पाचवी अटक; शूटर्सना मदत करणारा आरोपीच्या मुसक्या आवळल्या

  • Written By: Published:
Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणात पाचवी अटक; शूटर्सना मदत करणारा आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Salman Khan Firing Case 5th accused arrested : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ( Salman Khan ) घरावर गोळीबाराची ( Firing Case ) घटना घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवित आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. त्यानंतर आज (दि.7) क्राईम ब्रांचने शूटर्सना मदत करणाऱ्या पाचव्या आरोपीच्या ( accused arrested ) मुसक्या आवळल्या आहेत.

T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची जर्सी लाँच; खेळाडू दिसणार नव्या रंगात

या पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. त्याचं नाव मोहम्मद चौधरी असं आहे. मुंबई पोलिसांनी सांगितलं की, मोहम्मद याने सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सला पैसे पुरवणे आणि रेकी करण्यामध्ये मदत केली. त्यानंतर आता या आरोपीला मुंबईमध्ये आणून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांकडून त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याची मागणी केली जाईल.

‘त्यांच्यावर काहीतरी परिणाम झालाय’; पैसेवाटपाच्या आरोपांवर अजितदादांचं प्रत्युत्तर

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

14 एप्रिलला पहाटे दोन दुचाकीस्वारांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर अभिनेत्याचे कुटुंब, बॉलीवूड इंडस्ट्री आणि चाहते त्याच्या सुरक्षेबाबत चिंतित झाले होते. नंतर एका मेलद्वारे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या घटनेची जबाबदारी घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी मुंबई पोलिसांनी दोन्ही दुचाकीस्वारांना गुजरातमधील कच्छमधून अटक केली.

अबब! दूध 210 रुपये लिटर, चहाचा घोटही दुरापास्त; भारताच्या शेजारी महागाईचा आगडोंब

तसेच आता त्यांना 25 एप्रिल 2024 पर्यंत 10 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच ताब्यात घेतले गेले होते. मात्र, या गोळीबाराचं प्लॅनिंग काही एका दिवसात झालेलं नाही. यासाठीही मोठी तयारी करण्यात आली होती, याचा खुलासा आता झाला. याच दरम्यान 1 मे रोजी या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

अनुज स्थापन असं या 32 वर्षीय आरोपीचं नाव होतं. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्र पुरवल्याचा आरोप होता. तर मुंबई पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना या आरोपीने चादरीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज