अबब! दूध 210 रुपये लिटर, चहाचा घोटही दुरापास्त; भारताच्या शेजारी महागाईचा आगडोंब
Pakistan Inflation : भारताचा शेजारी देश पाकिस्तानात महागाईचा आगडोंब (Pakistan Inflation) उसळला आहे. दैनंदीन वस्तू खरेदी करण्यासाठीही लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. एक लिटक दुधाची किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. पाकिस्तानच्या कराची शहराच्या आयुक्तांनी डेअरी फार्मर्स असोसिएशनच्या मागण्या मान्य करून दुधाच्या दरात लिटरमागे दहा रुपयांची वाढ केली आहे.
एआरवाय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कराचीतील दुकाने आता 210 रुपये लिटर या दराने दुधाची (Inflation in Pakistan) विक्री करत आहेत. आता तर या दुधाच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. कराची आयुक्तांच्या सुचनेनुसार दुधाच्या दरात दहा रुपयांची वाढ सध्या झाली आहे. याआधी दर पन्नास रुपयांनी वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, प्रत्यक्षात मात्र दहा रुपयांची वाढ झाली. तरी देखील या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यातील नाहीत अशी येथील परिस्थिती आहे.
कंगाल पाकिस्तानात गव्हाचा वाद! सरकारची कोंडी, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा प्लॅन तयार
इकॉनॉनिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कराची डेअरी फार्मर्सचे अध्यक्ष मुबाशेर कादिर अब्बासी यांनी संकेत दिले की लवकरच दुधाच्या दरात पन्नास रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादनाचा वाढता खर्च, जनावरांच्या वाढत्या किंमती आणि सरकारचे दुर्लक्ष यांमुळे दुधाच्या दरात अचानक वाढ दिसून येत आहे. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून आयुक्तांनी वाढलेल्या दरांबाबत अधिसूचना काढण्याची गरज आहे. येत्या 10 मे पर्यंत याबाबत सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर हितधारक आपसी सहमतीने दुधाच्या किंमतीत वाढ करतील असा इशारा अब्बासी यांनी दिला.
राष्ट्रपती, पंतप्रधान अन् मंत्र्यांना पगार नाही
दरम्यान, याआधी शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी पगार आणि अन्य लाभ घेणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्याआधी राष्ट्रपती असिफ जरदारी यांनीही पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होते. नव्या मंत्रिमंडळाने याआधीच सरकार अनुदानित परदेश दौऱ्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्री, खासदार आणि सरकारी अधिकारी परवानगी घेतल्याशिवाय सरकारी निधी वापरून परदेश दौरे करू शकणार नाहीत.
Champions Trophy साठी पाकिस्तानला न येण्याचे परिणाम भोगावे लागणार; माजी क्रिकेटपटूचा भारताला इशारा