Pakistan Cricket मध्ये कर्णधार पदावरून वातावरण तापलं; उचलबांगडी केल्यामुळे आफ्रिदी नाराज

Pakistan Cricket मध्ये कर्णधार पदावरून वातावरण तापलं; उचलबांगडी केल्यामुळे आफ्रिदी नाराज

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( Pakistan Cricket ) संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवले (Babar Azam) आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. बोर्डाच्या निर्णयामुळे आणि आपल्या परस्पर बोर्डाने जारी केलेल्या शाहीनच्या प्रतिक्रियेच्या प्रेस नोटवर शाहीन आफ्रिदी नाराज आहे.

Ravindra Dhangekar यांच्या मदतीला भुजबळ; ट्रोलिंग नको, शिक्षणापेक्षा मनापासून काम करणे महत्वाचे

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक प्रेस नोट जारी केली. ज्यामध्ये शाहीन आफ्रिदीची प्रतिक्रिया देखील देण्यात आली होती. त्यानुसार शाहीनने म्हटलं होतं की, मला दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे. टीमचा खेळाडू या नात्याने मी कॅप्टन बाबर आझमचं समर्थन करेल. मी त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. मी त्याचा आदर करतो. मी मैदानात आणि बाहेर त्यांची मदत करेल. पाकिस्तानच्या टीमला जगातील सर्वात श्रेष्ठ टीम बनवणे हेच आमचं उद्दिष्ट आहे.

Arvind Kejriwal यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये होणार रवानगी?

त्यानंतर कर्णधारपदाच्या वादावरून शाहीन आफ्रिदी आपली प्रतिक्रिया देणार होता. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तात्काळ बैठक घेत त्याला ही प्रतिक्रिया देण्यापासून थांबवलं आहे. त्यामुळे कर्णधार पदावरून पाकिस्तान क्रिकेटमध्ये वातावरण चांगलाच तापलं आहे.शाहीन शाह आफ्रिदीने न्यूझीलँड दौऱ्यात संघाचे नेतृत्व केले होते.

परंतु, या दौऱ्यात पाकिस्तानचा पराभव झाला. परंतु, फक्त एका पराभवानंतर कर्णधारपदावरून काढून टाकणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात होता. या प्रश्नाचे उत्तर मात्र बोर्डाकडे नव्हते. असे असतानाही शाहीन शाह आफ्रिदीला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube