Breaking! पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Blast At Pakistan Stadium During Cricket Match : पाकिस्तानमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट ग्राऊंडमध्ये शनिवारी क्रिकेट सामन्यादरम्यान भयंकर बॉम्बस्फोट झाला, ज्यात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, मैदानात अचानक स्फोट झाल्याने धुराचे लोट पसरले आणि मोठा गोंधळ उडाला.
क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट
पोलीसांच्या माहितीनुसार, हा स्फोट पूर्वनियोजित होता (Pakistan) आणि तात्काळ विस्फोटक उपकरणाचा (IED) वापर करून घडवला गेला. बाजौर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी वकास रफीक यांनी सांगितले की, स्फोटाचा (Blast) उद्देश लक्षित हल्ला होता. या दुर्घटनेत मुलांसह अनेक जण जखमी झाले (Cricket Match) असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
This is the menace of Khawarij!At Kausar Ground,Khar,Bajaur,a bomb blast was carried out during a cricket match,targeting innocent civilians.These beasts, who play with the blood of innocents, are the greatest enemies of Islam and humanity.#NoToTerrorism #Bajaur #Pakistan pic.twitter.com/CNnawiXMvt
— Eagle Claw (@EagleClawStrike) September 6, 2025
स्फोटानंतर मैदानावर उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षक पळताना दिसले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विस्फोट इतका जोराचा होता की जमिनीवर धडधड झाल्यासारखे वाटले. अनेक जण घाबरून पळाले. या घटनेमुळे पाकिस्तानमधील सार्वजनिक ठिकाणी आणि खेळ आयोजने सुरक्षित आहेत का, याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
दहशतवाद्यांचा पोलीस ठाण्यावर हल्ला
यापूर्वीही या प्रांतात दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये एका हवालदारासह एक नागरिक जखमी झाला. तरीही त्या हल्ल्यात मुख्य लक्ष्य साध्य झाले नाही. अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
नागरिकांमध्ये दहशत
पाकिस्तानी सुरक्षा दलांनी परिसरात गस्त वाढवली आहे आणि पुढील हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद क्रिया दिसल्यास ताबडतोब माहिती देण्याचे सांगितले आहे. ही घटना बाजौर जिल्ह्यातील सुरक्षा स्थितीबाबत गंभीर चिंतेची बाब ठरली आहे. या स्फोटामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रम आणि खेळ आयोजनांवर विशेष लक्ष ठेवले आहे.