Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

Pakistan Cricket Board Chairman Zaka Ashraf Resignation : विश्वचषकातील निराशाजनक कामगिरी त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला नामुष्कीजनक पराभव यांमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) भूकंप आला आहे. आधी संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांच्यासह आणखी दोन प्रशिक्षकांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जका अश्रफ (Zaka Ashraf) यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अश्रफ यांनी मागील जून महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. परंतु, त्यांना फक्त सात महिनेच कामकाज करता आले.

Imad Wasim : पाकिस्तानला धक्का! वर्ल्डकपनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती

लाहोर शहरात आयोजित करण्यात आलेल्या बोर्डाच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत अश्रफ यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक यांच्याकडे सोपवण्यात आला. यानंतर बोर्डाचा नवा अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान घेतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काही दिवसांपासून आर्थिक संकटात आहे. त्यातच सरकारने अश्रफ यांना कोणतीही बैठक घेण्यापासून रोखले होते. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारच्या समन्वय समितीने अश्रफ यांना याच आठवड्यात क्रिकेट बोर्डाची बैठक आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापासून रोखले होते. यानंतरही अश्रफ यांनी 10 सदस्यांच्या प्रबंधन समितीची बैठक बोलावत राजीनाम्याची घोषणा केली. पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही सुधारणा करण्याच्या उद्देशाने मी काम करत होतो. परंतु, या पद्धतीचे काम करणे आम्हाला येथे शक्य होत नाही. यानंतर आता पंतप्रधान या पदावर कुणाची नियुक्ती करतात हा त्यांचा अधिकार आहे, असे अश्रफ म्हणाल्याचे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांनी दिले आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये भूकंप; बाबर आझम सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरुन पायउतार

तीन प्रशिक्षकांची हकालपट्टी 

दरम्यान, विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर विदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक या तिघांची हकालपट्टी करण्यात आली होती. पाकिस्तान संघ विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये दाखल होऊ शकला नव्हता. यानंतर संघात मोठे बदल झाले होते. बाबर आझमने (Babar Azam) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कलनेही आधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया मालिकेच्या आधी नवीन कोचिंग स्टाफ नियुक्त करण्यात आला होता त्यानंतर मालिकेतील अत्यंत निराशाजनक कामगिरीनतंर प्रशिक्षकांचीही सुट्टी करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज