IND vs PAK Asia Cup 2025 : हँडशेक प्रकरणानंतर पाकिस्तानची फजिती! उद्या सामन्यात नवा ड्रामा होणार?

Asia Cup 2025 : 14 सप्टेंबर 2025, रविवार. आशिया कप 2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला.

IND Vs PAK Asia Cup 2025

IND VS PAK Asia Cup 2025 : 14 सप्टेंबर 2025, रविवार. आशिया कप 2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच दबाव टाकत पाकिस्तानला अडचणीत आणले. साहिबजादा फरहान आणि शाहीन आफ्रिदी यांनी काहीसा प्रतिकार केला, पण धावसंख्या मोठी उभारता आली नाही. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळी करत सामना सहज जिंकला.

सामना संपल्यानंतर पाकिस्तान…

पण खरी चर्चा मात्र सामन्यानंतरच्या प्रकारावर (IND vs PAK) झाली. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू हँडशेकसाठी थांबले असताना सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी थेट मैदान सोडून ड्रेसिंग रुमचा मार्ग धरला. केवळ हात मिळवणे टाळलेच नाही, तर त्यांनी पाकिस्तानकडे वळून (Asia Cup 2025) पाहिले देखील नाही. त्यानंतर हर्षित राणाने पाकिस्तानच्या खेळाडूंसमोरच ड्रेसिंग रुमचे दार बंद केले. गौतम गंभीरसह (Cricket) भारतीय खेळाडू आतच वाट पाहत होते. या प्रकारामुळे वातावरण तापले आणि ‘हँडशेक वाद’ पेटला.

‘वॉकओव्हर’ देण्याचा निर्णय

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लगेचच आयसीसीकडे तक्रार दाखल करत भारताने आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला. तसेच मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटवावे, अशी मागणी केली. मात्र आयसीसीने पाकिस्तानची मागणी धुडकावून लावली. परिणामी जगासमोर पाकिस्तानची भलतीच फजिती झाली. यानंतर पाकिस्तानने नवा डाव रचत संपूर्ण आशिया कपवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. ‘वॉकओव्हर’ देण्याचा निर्णय जाहीर केला, पण आयसीसीच्या दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. बहिष्कार जाहीर करून पुन्हा सामना खेळायला उतरल्यानंतर पाकिस्तानची आणखी नाचक्की झाली.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना

दरम्यान, या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. काही संघटनांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामनाच रद्द करावा, अशी मागणी केली होती. कारण काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध भारतीय नागरिकांची हत्या केली होती. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी ठाणी उद्ध्वस्त केली. पाकिस्तानने ड्रोनद्वारे हल्ल्याचे भ्याड प्रयत्न केले, पण भारतीय लष्कराने ठाम प्रत्युत्तर दिले. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, असे अनेकांचे मत होते. मात्र आयसीसीच्या नियमांमुळे भारतीय संघाला मैदानावर उतरावेच लागले.

आता पुन्हा २१ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. मागच्या सामन्यातल्या “हँडशेक वादामुळे” आधीच वातावरण तापले आहे. त्यामुळे यावेळी पाकिस्तान कोणता नवा डाव खेळणार आणि आणखी किती फजिती करून घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

follow us