इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून 14 वर्षांचा वनवास संपवला; अवघ्या 2 दिवसांत संपली बॉक्सिंग डे टेस्ट
इंग्लंडने फक्त २ दिवसांत सामना 4 विकेट्सने आपल्या नावावर केला. असून या विजयाबरोबरच 14 वर्षांपासूनचा विजयाचा दुष्काळ संपवला.
Ashes Test 2025-26 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अॅशेज 2025-26 टेस्ट सिरीज सुरू असून चौथा सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या मॅचमध्ये गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आणि इंग्लंडने(England) फक्त २ दिवसांत हा सामना 4 विकेट्सने आपल्या नावावर केला. या सामन्यातील विजयाबरोबरच इंग्लंडने 14 वर्षांपासूनचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतल्यानंतर देखील सामना त्यांच्या हातातून निसटल्याचं पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाने(Austrelia) यापूर्वीच सीरिजमधील सुरुवातीचे तीनही सामने जिंकून अॅशेज सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियालची फलंदाजी काही खास पाहायला मिळाली नाही. तशीच काहीशी परिस्थिती इंग्लंच्या फलंदाजीबाबत देखील पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 110 धावांवर ऑल आऊट घेतलं. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने 42 धावांची आघाडी घेतली होती. दरम्यान हॅरी ब्रुकने सर्वात जास्त 41 धावा ठोकल्या. तो या इनिंगमध्ये 30 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला. तर दुसरीकडे माइकल नेसरने सर्वाधिक म्हणजेच 4 विकेट घेतल्या. स्कॉट बोलँडनेही तीन विकेट्स घेतल्या तर मिचेल स्टार्कनेही दोन विकेट घेतल्या आहेत.
पहिल्या इनिंगमध्ये 42 धावांची आघाडी घेऊन देखील दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाची कामगिरी काही खास राहिली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 34.3 ओव्हरमध्येच 132 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 46 धावा केल्या. परंतू इतर फलंदाज फ्लॉप ठरले. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने शानदार गोलंदाजी केली आणि चार विकेट्स घेतल्या आणि संघाला सावरण्यास मदत केली. कर्णधार बेन स्टोक्सनेही तीन विकेट्स घेतल्या.
विजयासाठी 175 धावांचं टार्गेट असताना इंग्लंडला दमदार सुरुवात मिळाली. जॅक क्रॉली आणि बेन डकेटने पहिल्या विकेटसाठी 51 धावा केल्या. जॅक क्रॉलीने 37 आणि बेन डकेटने 34 धावा केल्या. इंग्लंडच्या ओपनिंग जोडीकडून ही पहिलीच अर्धशतकीय पार्टनरशिप ठरली. त्यानंतर जेकब बेथेलने एक शानदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडचा 14 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिलाच टेस्ट विजय होता. याआधीचा विजय 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झाला होता.
